बोगस दिव्यांग कार्ड वापरुन सवलत प्रवास अडचणीचा ; मोहिम राबवण्याच्या सुचना
करमाळा समाचार

एसटीमध्ये प्रवास करताना सवलत मिळावी या हेतूने दिव्यांग असल्याचे भासवून खोटे प्रमाणपत्र व UDID कार्ड बोगस तयार करुन प्रवास केला जातो यावर कारवाई म्हणुन कार्ड बोगस आहे का तपासून संबंधितावर कारवाई करण्यात यावी अशा सूचना जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सोलापूर जिल्हा परिषद मनोज राऊत यांनी दिले आहेत. नुकतंच त्यांनी दिलेल्या पत्रामध्ये याबाबत सर्व विभागीय नियंत्रक महाराष्ट्र राज्य महामंडळ परिवहन यांना पत्राद्वारे कळवले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील विभागात व तालुकास्तरीय विभागातील आगार व्यवस्थापक यांना राऊत यांनी पत्र देऊन सूचना दिल्या आहेत. त्या माध्यमातून दिव्यांग प्रवासाचे प्रवास करतेवेळी स्वावलंबन UDID वेबसाईट मध्ये खात्री करून तसेच सदर प्रवासी दिव्यांग आहे का किंवा कसे याबाबत संबंधित वाहकाने खात्री करणे बंधनकारक असल्याचे संबंधित पत्रामध्ये नमूद केले आहे.
तसेच बोगस UDID कार्डधारकांना एसटीने प्रवास करत असतील. तर त्यांचे बोगस UDID कार्ड जमा करून दिव्यांग अधिनियम 2016 नुसार संबंधिता व कारवाई करण्यात यावी तसेच बोगस UDID कार्ड धारकांना अहवाल संबंधित कार्यालयाकडे सादर करावा अशी सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व विभागातून यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.


