करमाळासोलापूर जिल्हा

पंधरा दिवसात वीस जणांचा मृत्यु आताती लस द्या ; सरपंचाची प्रशासनाला विनंती

करमाळा समाचार 

करमाळा तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजविला आहे. मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील सोगाव येथे गेल्या पंधरा दिवसात वीस कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

गावामध्ये कोरोना बाधित मृत्यूचे प्रमाण वाढल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. परंतु शासकीय पातळीवर मात्र याबाबत ‘ सारे काही आलबेल’ असल्याचे चित्र आहे त्यामुळे गावात लसीकरण वाढवावे अशी मागणी सरपंच पुष्पलता गोडगे यांनी केली आहे.

करमाळा तालुक्यामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला वेग आला असला तरी लसीच्या तुटवड्यामुळे अनेक आरोग्य केंद्रांमध्ये नागरिकांना लसीविना माघारी फिरावे लागत आहे. लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत आहे. प्रतिबंधक लसीकरण गरजेचे होत आहे.

politics

त्यामुळे सोगाव येथे लसीकरण करण्यात यावे अशी
मागणी सरपंच पुष्पलता गोडगे यांनी जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्री यांना निवेदनाद्वारे केली होती. परंतु अद्यापपर्यंत गावांमध्ये लसीकरण झालेले नाही.

गावामधील ८० टक्के गावकरी कोरोनाच्या भितीमुळे गाव सोडून गावाबाहेर वाड्या वस्त्यावर शेतामध्ये आपला बाडबिस्तरा घेऊन राहावयास गेले आहेत. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या मध्ये तरुणांचा भरणा अधिक असल्याने हळहळ व चिंता व्यक्त केली जात आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE