करमाळाकृषीताज्या घडामोडीसहकारसोलापूर जिल्हासोलापूर शहर

नवनियुक्त संचालक आदिनाथ कारखान्यावर; घेतला परिस्थितीचा आढावा, सांगितल्या उपाययोजना

करमाळा समाचार

आदिनाथ सहकारी साखर कारखाना पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी मोठी आव्हाने असतानाही कारखाना सुरू करण्यासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे सर्वतोपरी मदत करणार असल्याची माहिती नवनियुक्त प्रशासकीय मंडळातील संचालक महेश चिवटे व संजय गुटाळ यांनी सांगितले.

पुढे बोलताना त्यांनी इतर तयारीबद्दल सांगत आहेत. सध्या आदिनाथ कारखान्यावर त्यांनी कामकाजाचा आढावा घेतला आहे. पुढील हंगाम यशस्वी पार पाडण्याचे नियोजन सुरू असल्याचे यातून दिसत आहे.

यासाठी कर्ज उपलब्ध करणे हे आव्हान असून ओटीएस ची तयारी व मागील संचालकाकडे असणारी थकबाकी त्यातून पैशाच्या नियोजन कसे करता येईल. याबाबत नियोजन करण्यात येणार आहे. मंत्री तानाजी सावंत यांनी कारखाना पूर्ण क्षमतेने चालला पाहिजे याबाबत सूचना दिल्या आहेत असे सांगताना कारखान्यासाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न कसा सोडवता येईल याकडेही लक्ष राहणार आहे.

कारखान्यातील कामगारांनी सध्या ले ऑफ दिला आहे. पगारीचा प्रश्न सोडवणे गरजेचे असून लाईटचा कायमचा प्रश्न मिटवण्यासाठी काय उपाय योजना करता येतील, ऊस वाहतुकीसाठी बैलगाडी आणि इतर वाहनांचे उपलब्धता करणे असे मोठी आव्हाने असताना त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा व कारखाना योग्यरित्या चालण्याचा प्रयत्न राहील असेही या दोघांनी सांगितले .

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE