लाल परी सेवा सुरू करण्याआधी चालक वाहकांचे लसीकरण पूर्ण व्हावे -प्रवीण अवचर
करमाळा समाचार
सध्या राज्यात लॉकडाऊन सुरु होऊन दीड महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आहे राज्यात काही जिल्हयात कोरोना रुग्ण संख्या कमी झालेल्या जिह्या अंतर्गत एस टी सेवा सुरू करण्याचा राज्यसरकार व परिवहन मंत्रि यांचा विचार सुरु आहे ,
मात्र एसटी चालक वाहक हे ड्युटी जास्तीत जास्त लोकांचे संपर्कात येत असतात कोणतेही सुरक्षा किट एसटी महामंडळ तर्फे पुरवले जात नाही , त्यामुळे मागिल कोरोना चे लाटेत अनेक चालक वाहकाना कोरोना संसर्ग झाला होता.

त्यात बरेच जणांचा मृत्यू पण झाले ,ड्युटी वर असताना अनेक प्रकारचे प्रवाशांचा संपर्क येत असतो काही प्रवाशी मास्क न घालता गर्दीत बस मध्ये चढत असतात ,जर एखादया रूट ला शेवटची बस असेल तर असन क्षमते पेक्षा जास्त प्रवाशी बस मध्ये नाईलाजाने बसवले जातात कारण त्यांना त्यांचे गावाकडे जायला शेवट ची बस असते , प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हनून चालक वाहक माणुसकी दाखवून त्यांना बस मध्ये प्रवेश देतात , एस टी महामंडळाने 50 %च प्रवाशी क्षमतेने बसेस चालवायला हव्यात.
कडक नियमावली प्रवाशांसाठी करायला त्यामुळे नक्कीच चालक वाहक सुरक्षित राहतील त्यांना फेस मास्क सानिटायझेर ,बस डेपो मधून सूट ताना पूर्ण स्वच्छ धुवून सानिटाईझ करूनच मार्गस्थ करायला हवी जेवणेकरून प्रवाशांना पण त्रास नाही होणार ,बस मध्ये स्वच्छतेचे नियमांचं पालन काठेखोर राबवायला हवं काही प्रवाशी बस मधेच गुटखा तंभाखु खाऊन थुंकतात , काही सर्दी झालेले प्रवाशी शिंकल्यामुळे सीट चे हँडल वर विषाणू तासन तास राहतात.

त्यामुळे त्या सीट वर बसलेले दुसरे प्रवाशी याना बाधा होते या सर्व गोष्टींचा बरकाईन विचार करून एस टी महामंडळाचे परिवहन मंत्री माननीय अनिल परब यांनी लाल परी सुरु करण्याचा निर्णय घ्यायला हवा.