करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिवेगव्हाण येथे विविध सामाजिक उपक्रम

करमाळा समाचार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना शाखा दिवेगव्हाण यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. जिल्हापरिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले तसेच फायबरच्या चार मोठ्या कचरा कुंड्या भेट देण्यात आल्या.त्याचबरोबर विद्यार्थांना खाऊ वाटप करण्यात आले.

पर्यावरणाचे महत्व जाणून संपूर्ण गावात भव्य प्रमाणात वृषारोपन कार्यक्रम घेण्यात आला .युवासेना उपतालुकाप्रमुख अभिषेक मोरे यांच्या संकल्पनेतून हे उपक्रम राबविण्यात आले.

यावेळेस, सरपंच हनुमंत खाटमोडे,अनिकेत पाडुळे, ज्ञानेश्वर मोरे, तुकाराम खाटमोडे, जुबेर शेख, संग्राम मोरे प्रथमेश खाटमोडे, शेखर मोरे, सागर मोरे, शाहू मोरे, हरी मोरे, रुषीकेश मोरे,संदेश पाडुळे, चक्रधर पाडुळे, सौरभ शिंदे,सुशील तनपुरे, माऊली पाटील, यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE