करमाळाक्राईमसोलापूर जिल्हासोलापूर शहर

व्हाया करमाळा – जामखेड ड्र्ग विक्री ; करमाळ्यासह जामखेडचा एक जण ताब्यात जामखेड पोलिसांची कारवाई

करमाळा समाचार

शहरी भागात सहज मिळणारी एम डी ड्रग आता ग्रामीण भागातही सर्रास मिळत असल्याच्या चर्चा सुरुवातीला ऐकायला मिळत होत्या. पण नुकतंच करमाळ्यातील एकाला जामखेड येथे ड्रग विक्री करताना पकडल्याने आता त्या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाला आहे. सदरची ड्रग्स ही प्रतिबंधित असून जीवघेणी असल्याने त्यावर कार्यवाही करण्याची गरज असल्याचे दिसून येते. पण करमाळ्यात अशी कारवाई न होता जामखेडच्या पोलिसांनी ही कामगिरी करून दाखवली आहे.

एमडी नामक ड्रग्स साधारण मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये मिळून येते. पण त्याचं लोन आता करमाळा जामखेड यासारख्या छोट्या गावांमध्येही जाऊन पोहोचले आहे. अतिशय महागडे असे हे ड्रग्स सहजरीत्या उपलब्ध करून यामध्ये तरुणाई भुलली जात आहे. त्याकडे संबंधित विभाग अर्थपूर्ण दुर्लक्ष करताना दिसत आहे का ? हा मोठा प्रश्न आहे. कारण मागील वर्षभरापासून करमाळा शहरात ड्रग विक्री केली जात असल्याच्या चर्चा आहेत. परंतु संबंधितांवर कारवाई झाली नसल्याने नेमकं प्रकरण काय आहे हे कळून येत नव्हते.

करमाळा शहरातील एक तरुण व जामखेड येथील दुसरा असे दोघेजण मिळून जामखेड येथे ड्रग विक्री करण्यासाठी गेल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून तब्बल एक लाख वीस हजार रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. सदरची ड्रग विक्री करमाळ्यातील मकसुद बागवान हा तरुण जामखेड येथे जाऊन करत होता. याशिवाय तो करमाळ्यातही करत असावा अशी शक्यता नाकारता येत नाही. त्यासह इतर अनेक जण या प्रकरणात सहभागी असू शकतात. परंतु स्थानिक पोलिसांना याची पुसटशीही कल्पना नसेल काय ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE