Video – रेल्वे रुळावरुन घसरुन मोठा अपघात ; इंजीनसह डबे रुळावरुन खाली
समाचार टीम
करमाळा तालुक्यातील केम येथे रेल्वे रुळावरून घसरून एकाच्या शेतात गेल्याने मोठा अपघात घडला आहे. सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी रेल्वेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

सोलापूरहून पुणे मार्गावर रेल्वेचे दोन ट्रॅक आहेत. या ट्रॅक वरून सिमेंटने भरलेली मालगाडी ही पुण्याच्या दिशेने जात होती. आज पहाटेच्या सुमारास ही रेल्वे गाडी रुळावरून खाली उतरली व थेट केम हद्दीतील खाणट यांच्या शेतात जाऊन थांबली. यावेळी रेल्वेचे इंजिनसह दोन डबे हे शेतात तर काही डबे रुळा खाली गेल्याचे दिसून आले.

याबाबत संबंधित विभागाला माहिती मिळाल्यानंतर तातडीने त्या ठिकाणी क्रेन उपलब्ध करण्यात आली. व काम पूर्ण करत रेल्वे पुन्हा एकदा पुढील दिशेने रवाना करण्याचे प्रयत्न सुरू झाले. तोपर्यंत परिसरात एका बाजूची रेल्वे लाईन बंद ठेवण्यात आली होती.