मतदानाचा टक्का घटला पण मतदान संख्या वाढली
करमाळा समाचार
- करमाळा तालुका विधानसभा मतदारसंघातून मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली असून आतापर्यंत 67.85% मतदान झाल्याची माहिती देण्यात आली आहे. एकूण तीन लाख 28 हजार 994 मतांपैकी दोन लाख 23 हजार 207 मतदात्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामध्ये एक लाख 19 हजार 583 पुरुष तर एक लाख तीन हजार सहाशे एकवीस महिलांनी मतदान केले आहे. (काही ठिकाणी मतदान सुरु असल्याने या आकडेवारीत बदल होऊ शकतो)
2019 मध्ये 71 टक्के मतदान झालेले होते. तर त्यावेळी दोन लाख पंधरा हजार 71 मतदान झाले होते. आता मतदानाची टक्केवारी जरी कमी झाली असली तरीही मतांचा आकडा हा दोन लाख 23 हजार 207 इतका झालेला आहे. त्यामुळे जवळपास मागे झालेल्या मतदाना पेक्षा अधिक मतदान यंदा झालेले दिसून येत आहे. मागील निवडणुकीत दोन लाख १५ हजार मतदान झाले होते.
२०१९ निवडणूक निकाल..
एकुण २ लाख १५ हजार ०७१ मतदान झाले होते. ७१. ०२ अशी टक्केवारी मोजण्यात आली होती. यामध्ये प्रमुख उमेदवार संजयमामा शिंदे यांना ७८हजार ८२२, नारायण पाटील ७३ हजार ३२८ व रश्मी बागल ५३ हजार २९५ मिळाले होते. यामध्ये शिंदे हे निवडणूक जिंकले होते.