तालुक्यातील पंधरा ग्रामपंचायतसाठी मतदान उद्या ; ५ संवेदनशील
करमाळा समाचार
तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीसाठी ६६ प्रभाग, ८८ केंद्र व ८८ पेट्यासह कर्मचारी रवाना झाले आहेत. दि ५ रोजी सकाळी सात ते साडे पाच वाजेपर्यत मतदान प्रक्रिया राबवण्यात येईल. पंधरा पैकी पाच ग्रामपंचायती अतिसंवेदनशील घोषीत केल्या आहेत. सर्व प्रक्रियेत निरिक्षक म्हणुन प्रियंका आंबेकर व सह निरिक्षक म्हणुन तहसिलदार विजयकुमार जाधव काम पाहत आहेत.

रविवारी होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. यावेळी करमाळा तालुक्यातील जेऊर, रामवाडी, कावळवाडी, भगतवाडी, राजुरी, चिखलठाण, गौडरे, कंदर, कोर्टी, केम, रावगाव, घोटी, वीट, केतुर, निंभोरे या गावांमध्ये सदरचे निवडणूक होणार आहे. तर यापूर्वी उंदरगाव ग्रामस्थांनी अविरोध निवडणुक केली आहे. या १५ ग्रामपंचायती पैकी जेऊर, केम, कोर्टी, कंदर, वीट या ठिकाणी संवेदनशील ग्रामपंचायत म्हणून पाहिले जात आहे, तर त्या ठिकाणी अधिकचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

साहेब म्हणाले…
ज्या भागात संवेदनशील व अतिसंवेदनशील गावात वाढीव बंदोबस्त नेमण्यात आला आहे. तर संपूर्ण यंत्रणा सज्ज झाल्यानंतर गावोगावी मतपेट्यांसह पोहोचवण्यात आले आहेत. उद्या होणारी निवडणूक शांततेत पार पडेल यासाठी पोलीस बंदोबस्त नेमला आहे.
– विजयकुमार जाधव,
तहसिलदार तथा निरिक्षक करमाळा.