करमाळासोलापूर जिल्हा

ॲड वीर यांच्याहस्ते सोने चांदी ज्वेलर्स चे थाताट उद्घाटन

करमाळा समाचार – सुनिल भोसले 

लॉकडाऊन मध्ये परिस्थिती अतिशय बिकट झाल्यानंतर आता पुन्हा एकदा परिस्थिती पूर्ववत होत आहे. त्यातच युवावर्ग सध्या नव्या जोमाने व्यवसायाकडे वळत असल्याने नक्कीच करमाळा तालुक्यात विकासाची गंगा वाहिल्याशिवाय राहणार नाही असे मत ॲडवोकेट कमलाकर वीर यांनी समृद्धी ज्वेलर्स च्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.

करमाळा शहरातील प्रसिद्ध सोन्या-चांदीचे व्यापारी गणेश शहाणे यांनी नुकत्याच करमाळ्यातील त्यांच्या दुसरे शाखेचे उद्घाटन राशिन पेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ केले आहे. त्या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा पार पडला.

यावेळी पुढे बोलताना वीर म्हणाले की, कोरोना सारखी महामारी आल्यामुळे अनेकांना आपले धंदे बदलावे लागले. तर अनेक जण अजूनही त्यातून सावरलेला नाही अशा परिस्थितीत पुन्हा एकदा युवकांनी आपल्या पायावर सक्षमपणे उभे राहावे यासाठी शासनाने ही सहकार्य करणे अपेक्षित आहे. तरी जागरूक नागरिक म्हणून आपल्या परिसरातील व तालुक्यातील धंद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी समोर येऊन या युवकांचे मनोबल वाढवणे गरजेचे आहे.

यावेळी प्रमुख उपस्थिती विद्या विकास मंडळाचे सचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, सोने चांदी व्यापारी विनोदशेठ कटारीया, भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, दिव्य मराठीचे पत्रकार विशाल घोलप, संजय शिलवंत, किराणा व्यापारी संतोष गुगळे, प्रा. पाटील सर, प्रा. भोंग सर, भागवत सर, राहुल गाडे, नितीन आढाव, पांडुरंग जाधव, आप्पासाहेब झिंझाडे, श्री चव्हाण, गणेश जगताप, आदिसह मान्यवर उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE