कुकडीचे पाणी करमाळा तालुक्याला न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा – संतोष वारे
प्रतिनिधी सुनिल भोसले
कुकडी प्रकल्पातील अतिरिक्त पाणी करमाळा तालुक्याला मिळावे म्हणून जलसंपदा मंत्री जयंत पाटील व पालक मंत्री भरणे मामा यांनी मला पाणी सोडण्याचा शब्द दिला होता. परंतु अद्याप पाणी सोडले नसल्याने मी जलसंपदा मंत्री जयंत पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रत्यक्ष भेटून पाणी सोडण्याची विनंती करणार आहे.


तरीही कुकडी प्रकल्पातील अतिरिक्त पाणी मांगी तलावात व दहीगाव उपसा सिंचन योजनेला अतिरिक्त पाणी न सोडल्यास तालुक्यावर अन्याय झाल्यास मी गप्प बसणार नाही. कुकडीचे अतिरिक्त पाणी सोडावे म्हणून मागणी करून सुद्धा जर करमाळा तालुक्यावर अन्याय होत असेल तर आंदोलन करणार असा इशारा राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनी करमाळा समाचारशी बोलताना दिला.