करमाळासोलापूर जिल्हा

प्रतिमेला जोडे मारुन निषेध केल्याच्या विरोधात खुपसेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक

प्रतिनिधी – अकलुज 


भ्रष्टवादी पक्षाच्या नेत्यांचे हात हक्काच्या पाण्यासाठी चळवळीत लढणाऱ्या शेतकरी नेते अतुल खुपसे पाटील यांच्या फोटोला लागले आहेत असे त्यामु ळे उजनीचे पाच टीएमसी पाणी पळविणाऱ्या दत्तात्रय भरणे यांचा निषेध करत शेतकरी नेते अतुल खूपसे पाटील यांची प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी माळशिरस तालुक्यामध्ये अकलूज येथे अतुल खूपसे पाटील यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करून पवित्र करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी जलाशयातील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला वळवले असल्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केल्याने इंदापूर तालुक्यात जल्लोष करण्यात आला. मात्र सोलापूर जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा आली असून यामध्ये शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

दरम्यान अशी बातमी मिळताच उजनी जलाशयांमध्ये शेतकरी नेते अतुल खूपसे पाटील यांनी दत्तात्रय भरणे यांच्या पुतळ्याची अंत्ययात्रा काढून तो पुतळा उजनी जलाशयात बुडवून निषेध व्यक्त केला होता. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये उजनी बचाव संघर्ष समितीची चळवळीची ठिणगी पेटली. दरम्यान इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकरी नेते अतुल खूपसे पाटील यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. इकडे लगेचच माळशिरस तालुक्यामध्ये खूपसे पाटील यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करून प्रतिमा स्वच्छ करण्यात आली.

यावेळी उजनी पाणी बचाव संघर्ष समितीचे सदस्य किरण भांगे, युवासेना अकलूज शहरप्रमुख शेखर खिलारे, जनहित शेतकरी संघटनेचे केशवराव लोखंडे, जनसेवा संघटना तालुका कार्यकारणी सदस्य महेश शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटना विद्यार्थी आघाडीचे शिवराम गायकवाड, प्रहार संघटनेचे अकलूज शहराध्यक्ष अविनाश सोनवणे, गोवर्धन खंडागळे, अजिंक्य पासगे इ.उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE