आम्हाला बैठकांना बोलवले जात नाही – शिवसेना तालुकाप्रमुखाची खंत ; आम्हाला बोलऊ नका पण तालुक्याचे प्रश्न सोडवा
करमाळा – विशाल घोलप
तालुक्यातील प्रमुख दोन व्यक्ती हे महाराष्ट्राच्या आता पदावर आहेत. तरीही पाहिजे तशी कामे करमाळा तालुक्यात होत नाही. त्याशिवाय तालुकाप्रमुख असतानाही आम्हाला कोणत्या बैठकांना बोलवले जात नाही अशी खंत व्यक्त करीत रिटेवाडी उपसा सिंचन योजना व आदिनाथ चा प्रश्न मार्गी लावावा. एक वेळ आम्हाला बोलू नका पण दोन्ही प्रश्न मार्गी लावा अशी मागणी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष देवानंद बागल यांनी केले आहे.

ते करमाळा येथे शिवसंकल्प अभियान व शिवसैनिक मेळावा यादरम्यान बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सोलापूरचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत हे उपस्थित होते.

पुढे बोलताना बागल म्हणाले की, शिवसेनेचे तालुकाप्रमुख देवानंद बागल यांनी कोणतीही भिडभाड न ठेवता आपल्या वरिष्ठ नेत्यांचे कान टोचले आहेत. यावेळी तालुक्यात प्रमुख पदावर असलेले मुख्यमंत्र्याचे ओएसडी व बाहेरचे जरी असले तर करमाळा तालुक्याचे झालेले तानाजीराव सावंत सध्या मोठ्या पदावर आहेत. तरीही तब्बल ६८ गावांचा बहिष्कारचा प्रस्ताव असणारी रिटेवाडी उपसा सिंचन योजना मार्गे लागत नसेल तर हे दुर्दैव आहे, याशिवाय ज्या आदिनाथ कारखान्याची मोळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते टाकण्यात आली. त्या कारखान्याची दुरावस्था झाली आहे. या कारखान्यालाही पुनर्जीवित करण्यासाठी वरिष्ठ पातळी लक्ष घातले पाहिजे अशी विनंती केली.
यावेळी भैरवनाथचे किरण सावंत, शिवसेनेचे अरविंद पवार शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, ता. संपर्क प्रमुख रविंद्र आमले, महिला नेत्या प्रियंका गायकवाड, माजी सभापती शेखर गाडे, गहिनीनाथ ननवरे, बिभिषण आवटे आदिसह शिवसैनिक उपस्थित आहेत.