केंद्र व राज्य मंत्रिमंडळातील कोणत्याही मंत्र्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही – सकल मराठा समाज
जेऊर – सुनिल भोसले
मराठा आरक्षण स्थगिती बाबत केंद्र व राज्य सरकारचा जेऊर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने जेऊर बाजारपेठ बंद ठेऊन निषेध नोंदविण्यात आला. आमच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा केंद्र व राज्य मंत्रिमंडळातील कोणत्याही मंत्र्याला महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचा घोषणा यावेळी करण्यात आल्या, पोलिस उपनिरीक्षक सचिन जाधव व मंडल अधिकारी एस. व्ही. केकाण यांना निवेदन देण्यात आले.

१) न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे कालपर्यंत झालेल्या सर्व भरती प्रक्रियेमध्ये फुलपट्टी लाऊन न तपासता आलेल्या सर्व जाहिरातींचा आधार धरून सर्वांना शासकीय सेवेत तत्काळ समजाऊन घेण्यात यावे. २) फडणवीस सरकारच्या काळात मराठा बांधवांवर झालेले गुन्हे तात्काळ माघार घ्यावे. ३) केलेली पोलिस भरती त्वरित थांबवावी किंवा मराठा बांधवांचा १३% वाटा राखीव ठेवावा. ४) ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचे फॉर्म भरलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांकरिता EWS ओपन करावेत, व त्यांना वर्ण श्रेणी बदलण्याचा अधिकार द्यावा. ५) ज्या विद्यार्थ्यांना आरक्षणाच्या भरवशावर प्रवेश मिळालेला आहे. अशा विद्यार्थ्यांना फिमध्ये सवलत मिळावी. आरक्षना प्रमाणे ५०% फी राज्य सरकारने भरावी. ६) ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली असेल त्या विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत लागू शकत नाही, अशांना विशेष बाब म्हणून समाविष्ट करण्यात यावे. ७) मराठा आरक्षणामध्ये न्यायालयाने दिलेल्या स्थगिती १६/४ प्रमाणे इंदिरा साहनी खटल्याचा दाखला देण्यात आलेला आहे. मराठा आरक्षण १५/४ प्रमाणे सामाजिक व शैक्षणिक रित्या मागासलेले असल्याने देण्यात आलेले आहे. या करिता राज्य सरकारने तत्काळ पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे स्थगीत करण्याची मागणी करावी. ८) सारथी संस्थेला भरघोस आर्थिक मदत करण्यात यावी. ९/ अण्णासाहेब पाटील कर्ज योजने बाबद बँकांना सूचना द्याव्यात. १०) ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता ओबीसीमध्ये एक स्वतंत्र वर्ग करून मर्थ्यांचा ओबीसी मध्ये समावेश करण्यात यावा.

अशा मागण्या यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आल्या. मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी सरकारला देण्यात आला.