तालुक्यातील चारशे शाळामध्ये वृक्षारोपण करणार ; मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने घोषणा
करमाळा समाचार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सन्मानार्थ करमाळा तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी यांच्या वतीने वीट ता. करमाळा येथील जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. त्याच पद्धतीने तालुक्यातील जवळपास चारशे शाळांमध्ये वृक्षारोपणाचे काम शिवसेनेच्या वतीने हाती घेण्यात आल्याची माहिती सभापती अतुल पाटील व जिल्हा परिषद सदस्य बिभीषण आवटे यांनी दिली आहे.

यावेळी वीट येथे जिल्हा परिषद सदस्य बिबीशन आवटे, माजी सभापती शेखर गाडे, पंचायत समिती सदस्य विलास मुळे ,उपसरपंच वीट समाधान कांबळे, सदस्य ज्योतीराम जाधव, श्रीकांत जाधव, नवनाथ जाधव, सुभाष जाधव, कांतीलाल चोपडे, दिगंबर चोपडे, दीपक आवटे, हनुमंत आवटे, नागनाथ जाधव, दादाश्री फाउंडेशन मार्फत झाडे लावले अध्यक्ष माधव जाधव, सचिव काकासाहेब काकडे, भाऊ गाडे, अंकुश जगदाळे, अनिल चोपडे, किशोर चोपडे, शिक्षक हनुमंत सर ओंबासे सर अंगणवाडी साठी स्मार्ट किट वाटप आतकर मॅडम ,चोपडे मॅडम सेविका व मदतनीस उपस्थित होते.
