करमाळामाढासोलापूर जिल्हा

शिवसेनेच्या नगराध्यक्षाचे धाकले बंधु राष्ट्रवादीत ; जिल्हा प्रमुखाच्या गावात शिवसेनेला खिंडार

प्रतिनिधी/कुर्डुवाडी


नगराध्यक्ष समीर मुलाणी यांचे छोटे बंधू अमीर मुलाणी यांची राष्ट्रवादी युवकच्या शहराध्यक्ष पदी निवड झाल्याने शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे.आगामी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादी अशी आघाडी जरी झाली तरी याचा परिणाम शिवसेनेवर होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून होत आहे.

शहराच्या राजकारणात जातीय समिकरणाचा मोठा प्रभाव राहिला आहे.२००६ साली शिवसेनेला धोबीपछाड देत राष्ट्रवादीने एका जागेचा अपवाद वगळता १६ जागा जिंकून सत्ता काबीज करण्यात यश मिळवले होते.परंतु २०११ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने विद्यमान नगराध्यक्ष समीर मुलाणी यांना उमेदवारी नाकारल्याने शिवसेना पुरस्कृत म्हणून निवडणूक लढवली होती त्यावेळी त्यांच्याबरोबर माजी नगराध्यक्ष व कुर्डुवाडीचे किंगमेकर काशीनाथ भिसे यांच्या सून जयश्री भिसे या ही शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आल्या होत्या.

राष्ट्रवादीच्या पाच वर्षांच्या कालावधीत अनुराधा गवळी पहिले अडीच वर्ष व नंतरची सव्वा वर्ष विद्यमान नगराध्यक्ष समीर मुलाणी व सव्वा वर्ष निवृत्ती गोरे यांची नगराध्यक्ष पदी वर्णी लागली होती.२०११ च्या नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी कडून तब्बल ७१ जण इच्छुकांच्या यादीत होते.यात डावललेले मुलाणी आणि भिसे हे पुरस्कृत झाले .आणि शिवशक्ती – भीमशक्ती- मुस्लिमशक्ती अशी युती होऊन नगरपरिषदेत २००६ च्या पराभवाचे उट्टे काढत राष्ट्रवादी कडून सर्व जागा पुन्हा मिळवण्यात यश मिळवले.

जनतेतून नगराध्यक्ष आणि जनरल पुरुष जागेसाठी आरक्षित जागेवर शिवसेनेने समीर मुलाणी यांना उमेदवारी दिली तर मुलाणी यांच्या २०११ सालच्या सहकारी जयश्री भिसे या शिवसेने विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेद्वारीवर उभ्या ठाकल्या यावेळी भिसे यांच्याबरोबर भीमशक्ती होती .तरीही जागा कमी येऊनही शिवसेनेला नगराध्यक्षपद मिळवण्यात यश आहे होते.मात्र आता १० वर्षानंतर शिवसेनेचे विद्यमान नगराध्यक्ष समीर मुलाणी यांचे बंधू पुन्हा स्वगृही राष्ट्रवादीत गेल्याने शिवसेनेचे ताकद काही प्रमाणात का होईना कमी झाली असल्याचे जाणकारांचे मत आहे.

गावठाण आणि रेल्वे वसाहत असे शहराचे दोन भाग आहेत.गावठाणातील टेंभुर्णी रोड भागात विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांचे वर्चस्व आहे.तर रेल्वे वसाहत भागात रिपाई चे बापूसाहेब जगताप यांचे वर्चस्व आहे.माजी नगरसेवक अमरकुमार माने व बापूसाहेब जगताप यांच्यातील दुरावा कमी झाल्याने आता निर्विवाद वर्चस्व असणार आहे.तालुक्यातील शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी व ज्यांच्यामुळे गेली १० वर्ष सत्ता टिकवण्यात आलेले यश हे अमीर मुलाणी यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे अवघड झाले आहे.

माढा तालुक्यात १९९६ पासून शिंदे यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित करत गड भक्कम केला आहे. तुलनेत शिवसेनेला नगरपरिषद वगळता इतर स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये सत्ता स्थापन करण्यात यश आलेले नाही. जातीय समिकरणांचा विचार करता.रासपा,रिपाई व नाराज गट यांच्या सहकार्याने मोठे आवाहन उभे करू शकते.यामध्ये २०११ साली मदत केलेले अकलूजकर , वाकावचे सावंत बंधू ,यांची भूमिका वेगळे चित्र निर्माण करू शकते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE