करमाळासोलापूर जिल्हा

माजी आ. जगताप यांच्या अनोखा फार्म्युला ; ग्रामस्थांकडुन होतेय स्वागत

करमाळा समाचार 

बोरगाव ग्रामपंचायतीमधे चारही महिलांना मिळणार सरपंच पदाची संधी : मा.आ जगताप यांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक :बोरगाव ग्रामपंचायतीमधे आ . शिंदे – माजी . आ जगताप गटाची सत्ता आलेनंतर सरपंचपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी निघाले . यावेळी शिंदे – जगताप गटातील सदस्यांनी माजी आ. जयवंतराव जगताप भेट घेतली.

माजी आ. जगताप यांनी आरक्षण जरी सर्वसाधारण असले तरी विजयी ४ ही महिला सदस्यांना सरपंच पदाची संधी देण्याचे सूतोवाच केले. ३ सदस्यांना प्रत्येकी १ -१ वर्ष व उर्वरीत १ सदस्यांना २ वर्षाची संधी देण्याचा फॉर्म्युला सूचविला व श्री . आदिनाथ महाराजांचे आशीर्वाद घेवून विकासात्मक कामाला लागण्याची सूचना केली .

त्यानुसार सर्वच सदस्यांनी यास त्वरीत मान्यता देवून श्री आदिनाथ मंदीरात चिट्ठ्या काढल्या त्यानुसार सर्वप्रथम सौ . शारदा महादेव गायकवाड, व्दितीय वर्ष सौ शकुंतला हनुमंत भोज, तृतीय वर्ष सौ . उज्वला श्रीराम भोगल व उवरीत दोन वर्षे सौ . हर्षाली विनय ननवरे यांना सरपंचपदाची संधी देण्याचे सर्वानुमते ठरले . तसेच उपसरपंच पदी श्री दत्तु सोपान खराडे यांना संधी देण्याचे सर्वानुमते ठरले .

सर्वाना समान संधी व सर्वसाधारण आरक्षण असून जातीपाती विरहीत सर्वांना समान संधी देण्याच्या माजी आ. जगताप यांच्या या निर्णयाचे व नूतन सदस्य तसेच बोरगाव ग्रामस्थांच्या विकासात्मक बाबीस पाठबळ देण्याच्या प्रवृत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे . सर्व नूतन सदस्यास पुढील विकासात्मक वाटचालीस आ .संजयमामा शिंदे, माजी आ. जयवंतराव जगताप यांनी शुभेच्छा दिल्या .

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE