तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत श्री.राजेश्वर विद्यालयाचा १४ वर्षे वयोगातील मुलींचा संघ विजेता
करमाळा समाचार – संजय साखरे
शनिवारी क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत, जिल्हा क्रीडा अधिकारी सोलापूर व जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर आयोजत तालुकास्तरीय शालेय हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा भारत हायस्कूल व ज्युनियर कॉलेज जेऊरच्या मैदानावर पार पडल्या. हॉलीबॉल स्पर्धेमध्ये श्री राजेश्वर विद्यालय राजुरीचा १४ वर्षे वयोगटातील मुलींचा संघ विजेता तर १४ वर्षे वयोगट मुले व १७ वर्ष वयोगटातील मुलांचा संघ उपविजयी ठरला.

हॉलीबॉलच्या सर्व खेळाडूंना क्रीडा मार्गदर्शक शिक्षक श्री. मारूती साखरे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री अनिल झोळ, संस्थापक सचिव श्री लालासाहेब जगताप सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, राजुरी ग्रामस्थ,पालक वर्ग व प्रशालीचे माजी विद्यार्थी शाहरुख शेख, रमजान मनेरी आणि सागर सोनवणे यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.