करमाळासोलापूर जिल्हा

BREAKING NEWS – विनापरवाना कोविड १९ एंटिजन टेस्ट ; डॉक्टरसह लॅब चालकावर गुन्हा दाखल

करमाळा समाचार –

करमाळा तालुक्यातील मौजे जेऊर ता. करमाळा येथील कृष्णाई हॉस्पिटल मध्ये भोसले लॅबोरेटरी मध्ये विनापरवाना covid-19 ची रॅपिड एंटीजन टेस्ट करताना मिळून आल्याने डॉ. हेमंत पांढरे (वय ५१) रा. जेऊर ता. करमाळा व लॅब चालक प्रशांत भोसले (वय २४) भांडगाव ता. परंडा जि. उस्मानाबाद विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे व पोलिस निरिक्षक सुर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलिसांनी केली आहे.

येथील उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांना गोपनीय माहिती मिळाली की जेऊर गावांमध्ये डॉ. पांढरे व लॅब टेक्नीशियन भोसले हे विनापरवाना पेशंटची टेस्ट करत आहेत. त्याप्रमाणे हिरे यांनी करमाळा पोलिसांना याबाबत कारवाईचे आदेश दिले. त्या ठिकाणी जाऊन खात्री करण्याकरिता साहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एन. जाधव, पो. कॉ. खैरे, उपविभागीय कार्यालयातील पो. ना शेख, पो. कॉ. भोसले या पथकाला सांगितले.

यावेळी डमी पेशंट म्हणून रोशेवाडी येथील एकास कृष्णाई हॉस्पिटलमध्ये दुपारी बाराच्या सुमारास पाठवले. त्यांच्याकडे एंटिजन टेस्ट करण्याबाबत डॉ. हेमंत पांढरे यांनी भोसले लॅबोरेटरीच्या नावाने चिठ्ठी लिहून संबंधिताची टेस्ट करण्यासाठी सांगितले.

यावेळी सदर लॅब चालकाकडे वापरलेले किट व न वापरलेले किट मिळुन आले. याबाबत लेखी अहवाल तालुका वैद्यकीय अधिकारी सागर गायकवाड यांना दिल्यानंतर त्यांनी जेऊर येथील कृष्णाई हॉस्पिटल मधील डॉ. भोसलेसह लॅब चालकावर कोविड १९ ची टेस्ट करण्याची परवानगी नसल्याने सरकारतर्फे तक्रार दिल्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE