करमाळा तालुक्यातील पोथरे येथील मल्लाची उत्तर प्रदेश, नोएडा येथील कुस्ती स्पर्धेत निवड
पोथरे प्रतिनिधी अंगद देवकते
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलन पुणे येथे 23 एप्रिल रोजी जुनिअर फ्री स्टाईल महाराष्ट्र कुस्ती स्पर्धांचे आयोजन केले होते. यामध्ये महाराष्ट्र संघातील पैलवान मुला मुलींनी सहभाग घेतला. या कुस्ती स्पर्धेत पोथरे ता.करमाळा येथील पै.गौतम शिंदे याने मॅटवर ८० किलो गटात पै शुभम मगर यांच्यावर मात करून यशस्वी यश संपादीत करून विजय मिळवला.

त्याबद्दल त्यांची नोएडा उत्तर प्रदेश येथे निवड झाली आहे.या कुस्त्या 2 ते 4 एप्रिलला नोएडा,उत्तर प्रदेश येथे पार पडणार आहेत. पै.गौतम शिंदे हा जय हनुमान तालीम संघाचे वस्ताद पै.सुरेश (नाना) शिंदे व शहापूरी तालमीचा वस्ताद आण्णा नायकोडे, कोल्हापूर संघाचे वस्ताद पै.रवी पाटील,पै किरण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. कुस्तीचे प्राथमिक धडे वडीलांकडून मिळाले. घरची परिस्थिती जेमतेम पै.शिंदे यांची कुस्ती खेळण्याची आवड, मेहनत, चिकाटी, चपळाईने अनेक कुस्ती फड जिंकले असल्याने भैरवनाथ सहकारी साखर कारखाने त्याच्या खर्चाचा संपूर्ण जबाबदारी घेतली आहे.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पै.गौतम शिंदे ची आत्तापर्यंतची यशस्वी वाटचाल अशी ५८किलो गटात मॅटवर पंजाब नॅशनल गोल्ड मेडल, पुणे येथे अंतरराष्ट्रीय स्पर्धेत गोल्ड मेडल, ६२किलो गटात अकलूज त्रिमूर्ती केसरी, मैदानी गोल्ड मेडल” “७१किलो मध्ये महुद कुमार केसरी, राज्यस्तरीय वाशिम कुमार केसरी खुल्या मैदानी कुस्ती स्पर्धेत ७०किलो वजनी गटात “कुमार केसरी” गदेचा मान” तर आत्ता कुस्तीगीर परिषद मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलन पुणे येथे केल्याबद्दल व त्यांची पुढील कुस्ती स्पर्धेसाठी “नोएडा,उत्तर प्रदेश” येथे निवड झाल्याबद्दल माजी आमदार नारायण आबा पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप, पं. स. सभापती पै.शेखर गाडे, उप. सभापती पै.दत्ता सरडेसह,
कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रा. शिवाजी बंडगर, नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, डबल उप-महाराष्ट्र केसरी पै. अतुल भाऊ पाटील, भैरवनाथ शुगर कार्यकारी संचालक किरण सावंत, राष्ट्रीय समाज पक्ष तालुका अध्यक्ष अंगद देवकते, पोथरे पोलीस पाटील समाधान शिंदे-पाटील, आॅल इंडिया धनगर समाज महासंघाचे जिल्हा सचिव बाळासाहेब टकले, राष्ट्रवादी अल्प. सं. ता. अध्यक्ष शिवाजी जाधव, अ. सह. सा. का. माजी संचालक विठ्ठल भाऊ शिंदे, चेअरमन दादा साळुंखे, माजी सरपंच जयद्रथ शिंदे, बापू गोसावी, दादा मोहन शिंदे, कैलास जाघव, छगन शिंदे, आबासाहेब शिंदे, संजय जाधव, बबन जाधव, रणजित शिंदे, कार्तिक रणनवरे, शहाजी झिंजाडे, पै.बाबू झिंजाडे, पै.अयुब शेख, पै.लक्ष्मण शिरगीरे, पै.तात्या शिंदे, पै.शरद झिंजाडे, पै.सागर लगस, पै.दिपक शिंदे इत्यादी सर्वच स्तरातून पै.गौतम शिंदे चे अभिनंदन होत आहे.