करमाळासोलापूर जिल्हा

बंदसाठी पुढाकार घेणारी नगरपरिषद बंद काळातील गाळाभाडे घरपट्टीत सवलत देऊन संवेदना दाखवेल का ?

करमाळा समाचार 

थकलेली वसुली करताना नगरपरिषद कर्मचारी

कोरोना वाढत असताना कोरोना काळात अनेक निर्बंध लावले जात होते. तर आजही आठवडा बाजार जिन मैदान येथे भरत आहे. नवीन नवीन नियम व दंड यामुळे आधीच व्यापारी पुरता आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच नगरपालिकेने आता वसुलीची मोहीम तीव्र राबविल्याने अडचणीत सापडलेल्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. तर लॉकडाउन काळातील काही महिन्यांची थकबाकी ही माफ करावी अशी मागणी व्यापारी मधून केली जात आहे. करमाळा बंद साठी प्रोत्साहन देणारी नगरपालिका वसुली मध्ये व थकबाकीत सवलत देऊन व्यापाऱ्यांना व व्यावसायिकांना असं कार्य करेल का ?

जवळपास वर्षभराचा लॉकडाऊन व बंद दुकाने यामुळे सामान्यासह मोठे व्यापारी ही आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. तर सुरुवातीला रुग्ण आढळल्यानंतर नगरसेवक नगराध्यक्ष यांनी बंद साठी तीन ते चार वेळा आवाहनही केले होते. पण या बंद काळात व्यावसायिकांचा व मजुरांचा रोजगार बुडणार आहे. याची पुसटशीही कल्पना व जाणीव यांना आली नसावी का ? की आता पुन्हा त्यांच्याकडून वसुलीसाठी तीव्र मोहीम राबवली जात आहे. बंद पडलेल्या गाळ्यात व्यवसाय व धंदा झाला नसेल तर कशा पद्धतीने भाडे दिले जाणार हा प्रश्न सध्या व्यवसायिकांना सतावत आहे.

आठवडा बाजार तसेच इतर बाजारही करमाळ्यातील मुख्य चौकात भरत असत ते आता गावाच्या कोपर्‍यात नेल्याने अनेक व्यावसायिकांनी करमाळा याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे फक्त त्यांचाच व्यवसाय बुडाला असे नाही तर त्यांच्यामुळे शहरात जो ग्रामीण भागातून सामान्य नागरिक खरेदीसाठी येत होता तोही दुसरीकडे जाऊ लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरातील आवक-जावक वर मोठा परिणाम झाला आहे.

लॉकडाऊनच्या वेळी अनेक निर्बंध असल्याने व्यवसायिक करणे अवघड जात होते. त्यावेळी घरोघरी जाऊन विक्रीला ही बंधने होती अशा परिस्थितीत गाळे उघडून व्यवसाय करणे तर लांबच मग बंद गाळ्याच्या थकबाकीची वसुली तीव्र करण्याचा काय अर्थ आहे ? नगरपालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन गाळा भाडे तसेच वार्षिक घरपट्टी वर सवलत देणे गरजेचे आहे.

 

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE