करमाळ्यात आज निकाली कुस्त्या ; प्रमुख मल्लासह दिग्गज नेते मंडळींची हजेरी
समाचार –
भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करमाळा तालुक्यात निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजन केले आहे. सदरच्या कुस्त्या या ३० ऑक्टोंबर रोजी होणार आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने खासदार रणजितसिंह निंबाळकर, खासदार सुजय विखे पाटील यांच्यासह दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत.

सालाबाद प्रमाणे यंदाही चिवटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून निकाली कुस्त्यांचे आयोजन करमाळ्यात केले आहे. यावेळी अर्जुन पुरस्कार विजेते किरण भगत, बद्री आखाडा पै. रोहित चौधरी यांची प्रमुख कुस्ती होणार आहे.

या कुस्तीच्या उद्घाटन प्रसंगी खा. रणजीत सिंह नाईक निंबाळकर, खा सुजय विखे पाटील, गोपीचंद पडळकर, आ. सचिन कल्याण शेट्टी, शिवसेना नेते शिवाजी सावंत, मुख्यमंत्री सहायता वैद्यकीय पक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपमहाराष्ट्र केसरी विकी जाधव, महाराष्ट्र केसरी बालारफी शेख, महाराष्ट्र केसरी चंद्रहास बापू निमगिरे , उपमहाराष्ट्र केसरी अतुल पाटील, कुस्ती सम्राट असलम काझी, मुंबई पोलीस महेश डुकरे, शिवसेना बारामती शहराध्यक्ष पप्पू माने, सामाजिक कार्यकर्त्या कविता चव्हाण, भारत केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच शबनम शेख आदिंचे सन्मान केले जाणार आहेत.
आयोजक- महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, भाजपा तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ठाणे, काकासाहेब सरडे मोहन शिंदे,अभिजीत मुरूमकर , दादासाहेब देवकर ,मच्छिंद्र हाके ,सचिन गायकवाड ,सोमनाथ घाडगे ,विनोद महानवर, सतीश फंड, हनुमंत रणदिवे ,किरण बागल, आजिनाथ सुरवसे, नितिन निकम