यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील एन.सी.सी.विभागाचा निकाल100 %
करमाळा समाचार
येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील एन.सी.सी.विभागाचा निकाल 100 % लागलेला आहे. एन.सी.सी. मधील B व C परीक्षा प्रमाणपत्राचे वाटप महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्र 9बटालियनचे JCO खेंदाड साहेब, हवालदार विक्रमजीत सिंग व महाविद्यालयाचे उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सी.टी.ओ. निलेश भुसारे उपस्थित होते. या प्रमाणपत्र वाटप प्रसंगी JCO खेंदाडसाहेब यांनी कॅडेटला मोलाचे मार्गदर्शन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन विद्या विकास मंडळाचे सचिव मा. विलासरावजी घुमरे सर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील, वरिष्ठ विभाग उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे , कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक , कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.