करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

सारंगकर डेंटल सिटी स्कॅन (CBCT ) व नवीन अत्याधुनिक डेंटल हॉस्पिटल चे दिमाखात उदघाटन

करमाळा समाचार

करमाळा येथील सारंगकर डेंटल क्लिनिक चे डॉ चंद्रकांत सारंगकर व डॉ निशा सारंगकर यांच्या डेंटल सिटी स्कॅन व अत्याधुनिक डेंटल हॉस्पिटल चे उदघाटन मॅनेजिंग डायरेक्टर व मेडिकल डायरेक्टर UAIMS हॉस्पिटल सांगली चे माननिय डॉ मिलिंद पारीख व डॉ संजय कोग्रेकर यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी करमाळा परिसर व शहरातील तसेच अकलूज पंढरपूर नगर पुणे कोल्हापूर येथून आलेले त्यांचे सर्व सहकारी डॉक्टर्स नातेवाईक राजकीय सामाजिक शैक्षणिक व्यापारी असे सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .

आपल्या जिल्ह्यात व परिसरात डॉ सारंगकर यांनी जी आपल्या 22 वर्ष्यांच्या दंत वैद्यकीय सेवे मध्ये प्रगती केली आहे ते सर्वाना पाहायला मिळाली . चांगल्या प्रकारची अत्याधुनिक सेवा तालुक्याच्या ठिकाणी पेशंट ला मिळावी व त्याचा त्यांना लाभ व्हावा अशी प्रतिक्रिया डॉ चंद्रकांत व डॉ निशा सारंगकर यांनी व्यक्त केली , यासाठी असणारे अत्याधुनिक असे डेंटल सिटी स्कॅन ,अत्याधुनिक जंतू नासकीकरण विभाग , डिजिटल स्कॅनर ,लेसर त्यांनी आपल्या हॉस्पिटल मध्ये उपलब्ध करून दिला असून अशी सर्व उपचार एकाच छताखाली सेवा देणारे त्यांचे ग्रामीण महाराष्ट्रा तले पहिले हॉस्पिटल आहे .

4 डेंटल चेअर चा सेट अप असून 4 पूर्ण वेळ काम करणारे दंत रोग तज्ज्ञ व 3 व्हिजिटिंग डेंटल सर्जन उपलब्ध आहेत ,लहान मुलांचा विभाग , अत्याधुनिक रूट कॅनॉल ,दंत रोपण व लेझर विभाग आहेत
या सर्व उपचारांचा फायदा जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा असेही आवाहन त्यांनी केले व सर्वांचे आभार मानले

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE