फंडगल्ली खुन प्रकरणातील संशयीत पतीस अटक व पोलिस कोठडी

करमाळा समाचार

पत्नीचा खून करून अटकेत असलेला पती प्रफुल पवार रा. फंड गल्ली, करमाळा यास न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यादरम्यान त्याच्याकडे खुनात वापरण्यात आलेले हत्यार व इतर माहिती जमवण्याचे काम पोलीस करणार आहेत. सदरचा प्रकार शनिवारी दुपारी साडेचार वाजता घडला होता तर रविवारी त्यास अटक करण्यात आली.

दारूच्या नशेत पत्नीला व मुलांना कायम मारहाण केल्यानंतर मामांनी भाच्याला मोहोळ येथे घेऊन गेले होते. त्याचा राग मनात धरून पती प्रफुल हा कायम उमा हिस मारहाण करत होता. शनिवारी ही त्याच पद्धतीने मारहाण केली व कोणतीतरी वस्तू डोक्यामागे मारून उमाचा खून केला होता शिवाय आत्महत्येचा बनाव करुन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.

याप्रकरणी प्रफुल्ल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यास न्यायालयात उभे केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी भार्गवी भोसले यांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. एन. जगदाळे हे करीत आहेत.

WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE
DMCA.com Protection Status