ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा येथे योगदिन उत्साहात साजरा
करमाळा(प्रतिनिधी)
आज दि.21 जून जागतिक योग दिनानिमित्त करमाळा येथील ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट मध्ये योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. इन्स्टिट्यूटच्या सर्व विद्यार्थ्यांना योग करण्याचे फायदे व योग दिनाचे महत्व समजावून देण्यात आले. सकाळच्या सत्रात सर्व इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना एकत्र करून योगा करण्यास लावले होते.

यावेळी जिल्हास्तरिय योगा स्पर्धेचे बक्षीस मिळवून राज्यस्तरीय योगा स्पर्धेत निवड झालेली ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट ची विद्यार्थीनी राजलक्ष्मी सुतार आणि गोरक्ष लोंढे तसेच इन्स्टिट्यूट चे विवेक कांबळे सर यांनी प्रात्यक्षिके करून दाखविली. या योगशिबिरास प्रा.महेश निकत सर संस्थापक अध्यक्ष ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट यांनी मार्गदर्शन केले व योगा , व्यायाम चे महत्व पटवून दिले .यावेळी इन्स्टिट्यूट मधील सर्व शिक्षकांनी योग शिबिर पार पाडण्यासाठी सहकार्य केले.
