करमाळासोलापूर जिल्हा

जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी ‘या’ योजनेचा लाभ घ्यावा – राजेभोसले

करमाळा समाचार – दिलीप दंगाणे

शेतकऱ्यांना शेती करताना आधुनिक शेती पद्धती आणखी सोपे करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कृषी विभाग तर्फे यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या आहेत. त्या अनेक योजना केंद्र सरकार कडून राबविल्या जातात. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या यांत्रिकरण योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद सदस्या सवितादेवी राजेभोसले यांनी केले आहे .

शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना बळीराजाला दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दरवर्षीप्रमाणे कृषी यांत्रिकीकरण योजने ची सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये शेती निगडीत विविध योजनेचा व शेती अवजारांचा सामाविष्ट करण्यात आलेला आहे. ही योजना सन 2020 /2021 या वर्षाकरिता असून शेतकरी बांधवांनी महाराष्ट्र शासनाच्या mahadbtmahati.gov.in या पोटॅलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत ऑनलाईन अर्ज सादर करताना सातबारा, आठ अ उतारा, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, मोबाईल क्रमांक सह खातेदार हजर पाहिजे.

संबंधित अर्ज भरतेवेळी स्वतःच्या व दुसऱ्याच्या आरोग्याची काळजी घेतली जावी. अर्ज भरल्यानंतर लाभार्थी निवड प्रक्रिया लकी ड्रॉ पद्धतीने केली जाईल. तरी कृपया जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या यांत्रिकरण योजनेचा लाभ घ्यावा व ऑनलाइन भरलेली पावती व्यवस्थित जपून ठेवावी असे आवाहन जिल्हा परिषद सदस्या सवितादेवी राजेभोसले यांनी केले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE