रस्ता अपघात टाळण्यासाठी युवकांचा स्त्युत्य उपक्रम
करमाळा समाचार
सध्या कोर्टी ते आवटी या रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्यादरम्यान वीट येते काम पूर्ण झालेले असल्याने त्या ठिकाणावरून वाहने भरधाव वेगात वाहत असतात. तर अद्याप संपूर्ण काम न झाल्याने रस्त्यावरील इतर रंगरंगोटी केलेली दिसून येत नाही. तर वीट परिसरात शाळा, बस थांबा असलेले या ठिकाणी पाच वेगवेगळ्या ठिकाणी गतीरोधक करण्यात आले आहेत अशा परिस्थितीत दुचाकी तसेच चार चाकी गाड्यांना लक्षात येत नसल्याने गावातीलच तरुणांनी सामाजिक बांधिलकी म्हणून ते गतरोधक रंगवले आहेत.

मुळातच बऱ्याच दिवसांनंतर रस्ता चांगला होतोय. रस्त्यावरून वाहने भरधाव वेगात वाहत आहेत हे कोणाला आवडत नाही. परंतु हे होत असताना या रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांच्या अपघाताच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. ज्या ठिकाणी रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहे, त्या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना राबवणे गरजेचे असल्याचे यातून दिसून येत आहे. बाहेरून जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांना त्रास होऊ नये म्हणून वीट गावातील या तरुणांनी केलेला हा उपक्रम नक्कीच स्तुत्य आहे. परंतु रस्ताचे काम जे करत आहेत त्यांनीही या गोष्टींकडे लक्ष दिले तर नक्कीच मोठ्या अपघातात टळतील.

गाव, बस स्टॅण्ड वर्दळ, शाळा लक्षात घेता ५ गतिरोधक तयार केले आहेत. परंतु ते गतिरोधक फोर व्हीलर, मोटरसायकल वाले यांच्या लक्षात येत नव्हते. मोटरसायकल वरून रोज कोणी ना कोणी पडत होते. त्यामुळेच एक सामाजिक बांधिलकी म्हणून मी लगेच प्रायमर घेऊन आलो आणि रात्री १० ते १ असे दोन दिवस काम केले. या गतिरोधक ला कलर देणेचे पुर्ण काम निस्वार्थपणे एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या वीट गावचे दत्तात्रय ( नाना ) अरूण चांदणे आणि पांडुरंग राजेंद्र चांदणे ( पेंटर ) या दोघांनी अतिशय तळमळीने अप्रतिम असे काम केले आहे. पाच ही गतिरोधक ला पांढरा कलर दिलेने आता वाहने ही सावकाश जा ये करतील एवढं नक्की. प्रतिक बापू गणगे, अक्षय हरिश्चंद्र गणगे, ईश्वर अरुण चांदणे हे पण रात्री एक वा पर्यंत काम संपेपर्यंत थांबले व सहकार्य केले.
तेजस ढेरे ,
सामाजिक कार्यकर्ते, वीट.