करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

विरोधकांचा डाव फसला आमदार रोहित पवारांवर अदिनाथ कृपा ; पवारांचे नेतृत्व आ. शिंदेंच्या हिताचे !

करमाळा समाचार –

तालुक्यात राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा समजला जाणारा आदिनाथ सहकारी साखर कारखाना आता तालुक्यातील एकाही गटाकडून न राहता थेट बारामती ॲग्रो कडे जाणार असल्याने तालुक्याच्या राजकारणावर याचा काय परिणाम होणार हे येणारा काळच सांगेल पण सध्याच्या परिस्थितीत रोहित पवारांकडे नेतृत्व गेल्याने करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांच्यासाठी ही फायद्याचेच ठरेल अशी शक्यता नाकारता येत नाही. तर कामगार व सभासदांच्या उत्साहामुळे पडद्यामागुन पवारांची बदनामी करणाऱ्यांची तोंडेही बंद पडतील.

करमाळा तालुक्‍यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या “बारामती ऍग्रो’ला 25 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय झाला आहे. राज्य शिखर बॅंकेचे कर्ज असल्याने बॅंकेकडून हा कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया सुरू होती. मुंबईत आज (ता. 12 जानेवारी) राज्य बॅंकेच्या कार्यालयात झालेल्या लिलाव प्रक्रियेत हा कारखाना “बारामती ऍग्रो’कडे देण्यात आला.

इतर देणी व पगारांचे काय ?
सध्यातरी आदिनाथ कारखाना बारामती ॲग्रो कडे गेल्या बाबत माहिती मिळत आहे. पण अजूनही कशा पद्धतीने व नेमकं कसं नियोजन आहे. याबाबत अधिक कल्पना देण्यात आली नाही. आदिनाथ कारखान्याच्या रखडलेल्या पगारी इतर देणी उपलब्ध साखर याचे नियोजन व भावी काळात होणाऱ्या पगारी यांचे काय नियोजन आहे हे अद्याप कळालेले नसुन, गुरुवारी ज्यावेळी कारखान्याची अधिकृत घोषणा करण्यात येईल त्या वेळीच सर्व काही स्पष्ट होणार आहे.

पवारांचे नेतृत्व संजयमामांसाठी फायद्याचे …


सध्या आदिनाथ सहकारी साखर कारखाना बारामती ऍग्रो चालण्यासाठी घेतला असला तरी स्थानिक आमदार संजय मामा शिंदे व आ. रोहित पवार यांचे निकटचे संबंध आहेत. संजय मामा हे राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची पैकी एक आहेत. त्यामुळेच रोहित पवार यांच्या प्रत्येक भूमिकेचा फायदा हा नक्कीच येणाऱ्या काळात राष्ट्रवादीला व संजय मामांना होणार असे चित्र आहे. त्यामुळे आजिनाथ जरी बारामती ऍग्रो कडे गेला असला तरी एक प्रकारे हा कारखाना संजय मामा शिंदे यांच्या फायद्याचा ठरू शकतो.

विरोधकांचा डाव फसला …
आदिनाथ सहकारी साखर कारखाना रोहित पवारांकडे जाऊ नये यासाठी मधल्या काळात काही गट सक्रिय झाले होते. त्या गटांचे मार्गदर्शन व नेतृत्व करणारी मंडळी पडद्यामागून आमदार रोहित पवार यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत होते जेणे करुन पवार अदिनाथ च्या शर्यतीतुन माघार घेतील पण तसे झाले नाही.  कामगारांच्या थकलेल्या पगारी व सभासदांना कारखाना पुन्हा एकदा उभारी घेईल अशी आशा निर्माण झालेली असल्याने कामगार व सभासद दोघेही उत्साहित असून विरोधकांचा डाव फसल्याचे दिसून येत आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE