जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरड या शाळेचा लहान मुलांचे आरोग्य तपासणी शिबिराच्या वेळी अनोखा उपक्रम
उमरड(प्रतिनिधी)
दिनांक 22/06/2021 रोजी आरोग्य विभागाच्या वतीने उमरड गावातील 0 ते 18 वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी आरोग्य विभागाच्या तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरड, वामनराव बदे माध्यमिक विद्यालय उमरड, गारगोट वस्ती शाळा, बदे वस्ती शाळा व गावातील आणि वस्ती वरील सर्व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आरोग्य तपासणी च्या वेळी केंद्रप्रमुख श्री नवनाथ ससाने सर, सरपंच बापू चोरमले, पोलीस पाटील अंकुश कोठावळे यांनी उपस्थिती दर्शविली.

डॉक्टर रोहित पवार, डॉक्टर दिनेश माने, डॉक्टर पंकज भोसले, डॉक्टर प्रियंका अतकरे, डॉक्टर शुभांगी रोकडे, डॉक्टर अनिता कांथले, यांच्या टीमने सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली यावेळी प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी व अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी त्यांना सहकार्य केले.
यावेळी डॉक्टरांच्या टीमच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले . आरोग्य तपासणीचे वेळी शिक्षकांनी व अंगणवाडी ताई यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आरोग्य विभागाच्या टीमच्या वतीने सर्वांचे कौतुक करण्यात आले.
