करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

रिटेवाडी उपसा सिंचन बाबत फडणवीस यांच्यासोबत सकारात्मक चर्चा ; थोड्याच वेळात पत्रकार परिषद

करमाळा समाचार

तालुक्यातील रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या मागणीसाठी परिसरातील चाळीस गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होत. त्या निमित्ताने काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यानंतर आज सोलापूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थितीत प्रमुख आंदोलनकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष रश्मी बागल याही उपस्थित होत्या. यावेळी सकारात्मक बैठक पार पडली असल्याचे श्री माने यांनी सांगितले आहे.

रिटेवाडी उपसा सिंचन योजना मार्गी लावा अन्यथा आम्ही निवडणुकीवर बहिष्कार घालू अशी मागणी केल्यानंतर वेगवेगळ्या नेतेमंडळींशी आंदोलनकर्त्यांनी चर्चा केल्या. परंतु समाधान मात्र होत नव्हते. त्यामुळे संबंधित आंदोलनकर्ते बहिष्कारावर ठाम होते. काही दिवसांवर निवडणूक आलेली असताना बहिष्कार तोही चाळीस गावांचा यामुळे प्रशासनाची ही दमछाक होताना दिसत होती. परंतु आता यावर तोडगा निघाल्याची दिसून येत आहे. थोड्याच वेळात याबाबत पत्रकार परिषद घेऊन संबंधित आंदोलनकर्ते आपली भूमिका जाहीर करतील.

शहाजी दगडू माने अंजनडोह, अंकुश गंगाराम शिंदे पोथरे, मदन रामचंद्र पाटील पिंपळवाडी, महेश प्रभाकर गणगे वीट, संदिप शेळके रावगाव, प्रवीण हरिश्चंद्र बिनवडे वंजारवाडी, बापूराव गणपत पवार हिवरवाडी, विष्णू राघोबा टकले धायखिंडी, विक्रम भिकू दहातोंडे रोशेवाडी, प्रीतम निवृत्ती सुरवसे भोसे, दादासाहेब एकनाथ कुदळे मोरवड, राजेंद्र शिवाजी भोसले राजुरी, नानासाहेब प्रकाश झाकणे कोर्टी, गौतम लक्ष्मण जगदाळे वीट, संदीप सूर्यकांत ढेरे वीट, अरविंद बापूराव जाधव, मधुकर काळे पिंपळवाडी आदि उपस्थित होते.

रश्मी बागल, दिपक चव्हाण, सुहास घोलप व इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. तरी थोड्याच वेळात आम्ही बहिष्कारवरील निर्णय तात्पुरता मागे घेण्याची जाहीर करणार आहोत. त्या संदर्भात बारा बंगले येथील बलदोटा यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. 
– शहाजी माने, आंदोलनकर्ते

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE