1 कोटीचा निधी उपलब्ध झालेला असून या निधीमधून तालुक्यातील 6 गावांमधील अंतर्गत रस्त्यांची कामे
प्रतिनिधी करमाळा
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील पुनर्वसित गावांमधील नागरी सुविधा कामांना 1 कोटीचा निधी उपलब्ध झालेला असून या निधीमधून तालुक्यातील 6 गावांमधील अंतर्गत रस्त्यांची कामे केली जातील अशी माहिती करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की , उजनी धरणामुळे करमाळा तालुक्यातील ,अनेक गावे पुनर्वसित झालेली आहेत .या गावांमध्ये नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. करमाळा तालुक्यासाठी या निधीमधून एक कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे .
यामध्ये उंदरगाव येथील अंतर्गत रस्त्याचे खडीकरण करणे यासाठी 26 लाख 14 हजार 550 रुपये , वांगी नंबर 2 येथील रस्त्याचे अंतर्गत खडीकरण करण्यासाठी 16 लाख 23 हजार 538 रुपये, वांगी नंबर चार येतील रस्त्याचे अंतर्गत खडीकरण करण्यासाठी 18 लाख 2 हजार रुपये तसेच स्मशानभूमी पोहोच रस्त्यासाठी 12 लाख 48 हजार 624 रुपये, रिटेवाडी येथील स्मशानभूमी पोहोच रस्त्यासाठी 19 लाख 44 हजार रुपये व वांगी नंबर 3 येथील स्मशानभूमी पोहोच रस्त्यासाठी 5 लाख रुपये असे एकूण 97 लाख 22 हजार 712 रुपये निधी मंजूर झालेला असून त्याची प्रशासकीय मान्यता ही मिळालेली आहे. लवकरच ही कामे पूर्ण होतील असे त्यांनी सांगितले.
