वडार समाज सभामंडपासाठी १० लाख रुपये मंजूर
करमाळा समाचार -संजय साखरे
तालक्यातील केम गावामध्ये वडार समाजासाठी समाज मंदिर बांधण्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय श्री रणजीतसिंह नाईक निंबाळकर साहेब यांनी खासदार निधीतून दहा लाख रुपये सभामंडप निधी मंजूर केला आहे. सहा महिन्यापूर्वी प्रहार संघटनेने व मी वडार महाराष्ट्राच्या संघटनेने खासदार निधीतून वडार समाज मंदिर मिळावे महणून पत्र दिले होते. त्या पत्राचा विचार करून माननीय खासदार साहेबांनी त्वरित वडार समाजासाठी वडार समाज मंदिर उभारण्यासाठी पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न केला.

त्याबद्दल सर्व वडार समाजाच्या वर्गामध्ये आनंद व्यक्त होत आहे. मा. रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार साहेबांचे स्वीय सहाय्यक राजेश शिंदे साहेब यांना अनेक वेळा प्रहार संघटनेचे करमाळा तालुकाध्यक्ष संदीप तळेकर यांनी फोन करून पाठपुरावा केला व त्यांनी त्या गोष्टीचा विचार करून वडार समाजाला न्याय मिळवून दिला आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाचे करमाळा तालुका अध्यक्ष संदीप भाऊ तळेकर, मी वडार महाराष्ट्राचा करमाळा तालुकाध्यक्ष सागर भाऊ पवार, माजी उपसरपंच भीमराव अण्णा चौगुले, उमेश शिंदे, महेश शिंदे, अविनाश पेटकर, समाधान पवार, दादा पेटकर, धोंडीराम धोत्रे, विलास धोत्रे, पिंटू धोत्रे, समाधान चौगुले,सागर पवार,काका धोत्रे, सतिष धोत्रे, बाबू पवार,यांच्या सर्वांच्या वतीने वडार समाजाच्या वतीने,माढा लोकसभा मतदारसंघ खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे आभार मानले आहेत.