बऱ्याच दिवसापासुन रखडलेल्या कामासाठी ८ कोटींचा निधी
प्रतिनिधी करमाळा – संजय साखरे
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा -2 सन 2022 – 23 जिल्हा नियोजन लेखाशीर्ष अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील फिसरे ते हिसरे हिवरे गौंडरे या इतर जिल्हा मार्गाची सुधारणा करण्यासाठी 8 कोटी 86 लाख रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.

याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, 10.77 किमी लांब असलेल्या सदर रस्त्यासाठी प्रति किमी 82 लक्ष 29 हजार रुपये मंजूर असून सदर काम कामासाठी एकूण 8 कोटी 86 लाख 23 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. सदर रस्ता हिसरे, हिवरे, गौंडरे या गावांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण होता. या रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर झाल्यामुळे हिसरे, हिवरे, कोळगाव, निमगाव या भागातील नागरिकांचा राज्यमार्ग 68 करमाळा ते कुर्डूवाडी या रस्त्याला मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे.