कारखान्यावर अपघात होऊन जखमी कर्मचाऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यु

करमाळा प्रतिनिधी

कमलाभवानी शुगर कारखाना लि. पांडे येथील कारखान्यात इलेक्ट्रिक विभागात नोकरीत असलेले बोरगाव येथील कर्मचारी गणेश नवनाथ खराडे हे विद्युत उपकरणाचे काम करत असताना तेथील उपकरणात स्पार्किंग होऊन लागलेल्या आगीत भाजले आहे. त्यांना पुढील उपचारांसाठी सोलापूर येथे पाठवले होते यावेळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे

पांडे ता. करमाळा येथील कमलाई शुगर हा कारखाना विक्रम शिंदे यांच्या मालकीचा आहे. सध्या कारखाना बंद असला तरी काही कर्मचारी उर्वरीत कामे करण्यासाठी कारखान्यावर येत असतात. त्याप्रमाणे गणेश खराडे हे नेहमी प्रमाणे सकाळी कामावर आले होते.

दि ७ रोजी सकाळी साडे आकराच्या सुमारास एक जोडीदार सोबत घेऊन खराडे हे मुख्य प्रवाह बंद करण्यासाठी गेले होते. त्यावेळी तिथे मुख्य स्विच बंद करण्यासाठी फेज काढताना एक फेज हातातुन सुटुन मुख्य स्वीच वर पडला व मोठी स्पार्किंग होऊ लागली त्यावेळी खराडे जवळच असल्याने त्यांना उडालेल्या भडक्यात स्वतःला बाजुला न करता आल्याने ते मोठ्याप्रमाणावर भाजले होते.

सुरुवातीला करमाळा येथील काॅटेज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र पुढील उपचारासाठी अश्विनी हाॅस्पिटल सोलापूर येथे हलविण्यात आले. याबाबत कारखान्याचे अध्यक्ष विक्रम शिंदे यांना फोन लावून संबंधित घटनेची जबाबदारी स्विकारुन त्या कर्मचाऱ्याच्या वैद्यकीय उपचारावर स्वतः लक्ष ठेवण्याचे आवाहन करमाळा ग्राहक पंचायत चे तालुकाध्यक्ष ॲड शशिकांत नरुटे यांनी केले होते.

तर संबंधित कर्मचाऱ्यांवर दवाखान्याचा कोणत्याही प्रकारचा आर्थिक बोजा पडणार नाही. यासाठी कारखान्याने सर्वोतोपरी मदत करण्याचे मान्य केले होते त्याप्रमाणे उपचारही सुरु होते. पण आज अखेर त्यांच्यावर सुरु असलेला उपचारांना यश आले नाही व त्यांचा मृत्यु झाला.

DMCA.com Protection Status
error: Don\'t try to copy. Content is protected !!