करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

केबल टाकण्यासाठी विनापरवाना खोदकाम ; प्रहारची कारवाईची मागणी

करमाळा समाचार

करमाळा तालुक्यातील केम भाळवणी व केम वडशिवणे अशा अनेक रस्त्यावर रस्त्याची दुरावस्था
होत आहे. जिओ 5g नेटवर्क OFC केबल पुरण्यासाठी अवैधरीत्या रस्त्याची खोदकाम विनापरवाना वृक्षतोड सुरू आहे. संबंधित जिओ कंपनी कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर झालेल्या नुकसानाचे दंड आकारून संबंधित कंपनीवर व कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करावी अशी म्मागणी प्रहार संघटना करमाळा तालुका अध्यक्ष संदीप भाऊ तळेकर यांच्यावतीने करण्यात आली आहे.

करमाळा तालुक्यातील केम वडशिवणे व केम भाळवणी अशा अनेक गावांमध्ये अवैधरीत्या जिओ कंपनीचे खोदकाम चालू आहे. करमाळा तालुक्यातील अनेक गावाला जोडणारे रस्ते जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, तसेच मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजना, पंतप्रधान ग्रामीण सडक योजना, मधील रस्त्यावर जिओ डिजिटल फायबर लिमिटेड कंपनीने 5g नेटवर्कOFC केबल टाकण्याचे काम चालू असल्याने संबंधित कंपनीने व कॉन्टॅक्टर कोणत्याही प्रकारची कोणत्याही विभागाकडून पूर्वपरवानगी घेतली नसल्याने कायद्याचे उल्लंघन करून काम चालू केले आहे.

रस्त्यापासून सहा मीटरचे अंतर ठेवून सदरचे खोदकाम करण्याच्या आवश्यक आहे. तरी सदर कंपनी दोन मीटर अंतरावर खोदकाम केलेले आहे. पक्क्या डांबरी रस्त्याचे खोदकाम करून रस्ता उध्वस्त केला आहे. विनापरवाना रस्ते उतरले आहेत. यामुळे पक्क्या डांबरी रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. रस्त्याची रुंदी कमी असल्यामुळे मोठ्या वाहनांना वाहतूक करणे अडचणीचे होत आहे. सदर खोदकामामुळे वाहने अडकण्याची शक्यता आहे. तर जीवित हानी होण्याची शक्यता आहे.

रस्त्यालगत असणारी झाडे अडथळ्यामुळे तोडली आहेत. सदर रस्त्यालगत चिकटून खोदकामे केलेली आहेत. जिओ कंपनीने व कॉन्ट्रॅक्टरने शासनाचे व प्रशासनाचे अधिकारी यांची फसवणूक करून कायद्याचे उल्लंघन करून चुकीच्या पद्धतीने काम करून शासनाची फसवणूक केली आहे. केबलच्या खोदकामामुळे केम गावामध्ये कुंकू कारखान्यामुळे अनेक मोठी वाहने पावसामुळे वाहने अडकणार आहेत. त्यामुळे केम गावातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या भागावर वाहतुकीचे परिणाम होणार आहे. या कंपनीचे कॉन्ट्रॅक्टर राजकारणी वरदहस्ताच्या पुढाकाराखाली दमदाठीने काम करत आहेत. एकतर करमाळा तालुक्यातील अनेक रस्ते खराब झाले आहेत. त्यातून प्रहार संघटना रस्त्याबाबत अनेक वेळा आवाज उठवत असताना अशा काही कंपन्या रस्त्याची विल्हेवाट करत आहेत.

त्यामुळे संबंधित रस्त्यावरील प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी करून डांबरी रस्त्याचे झाले नुकसान याचे आठ दिवसाच्या आत मध्ये इस्टिमेट बनवून सदर जिओ कंपनी व कॉन्ट्रॅक्टर यांच्या वरती दंड आकारून संबंधित काम बंद करावे अन्यथा प्रहार स्टाईलने जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे मोठ्या प्रमाणामध्ये 18/ 6/ 2023 रोजी आंदोलन करण्यात येईल. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे करमाळा तालुका अध्यक्ष संदीप भाऊ तळेकर, युवा जिल्हा आघाडी कार्याध्यक्ष गणेश उर्फ पप्पू कोंडलकर, युवा तालुका अध्यक्ष विकी मोरे, सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह ओहोळ यांच्यासह अनेक प्रहार संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE