बिनबुडाच्या बातम्यांकडे दुर्लक्ष करा ; खोट्या बातम्यांना बळी पडु नका – पो. नि. श्रीकांत पाडुळे
करमाळा समाचार
करमाळा तालुक्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांची बदली कुर्डुवाडी येथे झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून पाटील गटाच्या मागणीमुळे बदली झाल्याची वृत्त प्रसारित केले होते. त्याला उत्तर देताना श्रीकांत पाडळे यांनी अशा बिनबुडाच्या बातम्या येतील त्याकडे दुर्लक्ष करा अशी प्रतिक्रिया दिली आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी व नंतर पाटील गटासोबत पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडळे यांचे संबंध बिघडले याच्या चर्चा अनेकदा तालुक्यात ऐकायला मिळत होत्या. त्याच दरम्यान पाटील गटाचे नेते माजी आमदार नारायण पाटील यांनी श्रीकांत पाडुळे यांच्या बदलीसाठी प्रयत्न ही केले होते. त्यामुळे काही दिवस पाडूळे यांची पंढरपूर येथील बंदोबस्ताच्या नावाखाली बदली ही करण्यात आली होती. पण ती तात्पुरती स्वरूपाची होती. त्यानंतर पाडोळे हे पुन्हा एकदा करमाळा येथे रुजू झाले होते.

त्यानंतर काही घटनांमुळे श्री. पाडुळे व पाटील गटातील इतर कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे गेल्यामुळे पुन्हा दोन ते तीन वेळा बदलीची मागणी करत आंदोलनाचे इशारे ही देण्यात आले होते. पण तरीही पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांची बदली झालेली नव्हती. त्यानंतर भाजपाच्या वतीने ही आंदोलन करण्यात आले. तरीही त्यांची बदली झाली नव्हती. अखेर त्यांच्या कार्यकाल संपल्यानंतर त्यांची रीतसर बदली करण्यात आली. त्यानंतर एक वृत्त प्रसिद्ध झाले त्यामुळे पाडुळे पुन्हा बोलते झाले व त्यांनी या प्रकरणी उत्तर दिले आहे.
याबाबत बोलताना श्री. पाडुळे म्हणाले की, अशा बिनबुडाच्या बातम्या यापुढे दोन-तीन दिवस येतील. मित्रांनो, यात काही तथ्य नाही. माझा कालावधी संपून पाच-सहा महिने झाले होते त्यामुळे बदली झालेली आहे. कोणाच्या खोट्या बातम्यांना बळी पडू नका.