करमाळासोलापूर जिल्हा

हिवरे जिल्हापरिषद शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी शंभुराजे फरतडे तर उपाध्यक्ष पदी सिद्धेश्वर शिंदे यांची बिनविरोध निवड

करमाळा समाचार

हिवरे जिल्हापरिषद शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन प्रकियेसाठी मुख्याध्यापक सुग्रीव निळ यांनी पालक सभा बोलवली होती या वेळी अध्यक्ष पदी शंभुराजे शाहुराव फरतडे व उपाध्यक्ष पदी सिद्धेश्वर शिंदे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

या वेळी सदस्य म्हणून यशवंत ज्ञानदेव माने, चित्रा जोतीराम शिंदे,स्वाती नानासाहेब ठोंबरे, अश्विनी सुभाष फरतडे,सुरेखा दत्तात्रय खाडे यांची देखील बिनविरोध निवड करण्यात आली.

ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी म्हणून शिवाजी नागनाथ खाडे(सर) यांची तर शिक्षणप्रेमी म्हणून उत्तम चंद्रभान विटुकडे(सर) तात्या नागनाथ मगर व नवनाथ प्रल्हाद पाटील यांची तर शिक्षक प्रतिनिधी म्हणून कुलकर्णीं मॅडम यांची नियुक्ती करण्यात आली.

या वेळी मकाई चे माजी संचालक रघुनाथ फरतडे शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे, उपसरपंच दिलीप फरतडे ,ग्रामपंचायत सदस्य उमेश मगर ,अतुल फरतडे ,पांडुरंग डौले माजी शाळा समिती अध्यक्ष धनंजय फरतडे ,माजी सरपंच बापुराव फरतडे ,माजी सरपंच विश्वनाथ लोखंडे,युवा नेते अमोलदादा फरतडे,मच्छिंद्र लोखंडे,हणुमंत डौले ,विश्वंभर फरतडे, सोमनाथ ठोंबरे,बापु महानवर, ब्रह्मदेव फरतडे ,हणुमंत फरतडे आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक सुग्रीव निळ ,जेष्ठ शिक्षक निळकंट हनपुडे ,सुरेश शिंदे,लहु चेंडगे, जालिंदर हराळे ,सुर्यांवशी सर ,खरात सर यांनी नवीन पदाधिकाऱ्यांचे सत्कार केले.

निवडीनंतर बोलताना नूतन अध्यक्ष शंभुराजे फरतडे म्हणाले की हिवरे जिल्हापरिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासठी लोकसहभाग, ग्रामपंचायत व शासकीय योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE