पांडेतील मयुरी कुंभारचे यश ; बालदिनानिमित्त आयोजीत स्पर्धेत तालुक्यात तिसरा क्रमांक
करमाळा प्रतिनिधी – सुनिल भोसले
पांडे (ता. करमाळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता सातवीची विद्यार्थीनी मयुरी आत्माराम कुंभार हिचा बाल दिनानिमित्त आयोजित स्वलिखित कविता वाचन स्पर्धेत तालुक्यात तिसरा क्रमांक आला आहे.

सदर स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यामध्ये कुंभार हीने सादर केलेल्या कवितेचा क्रमांक घोषित करण्यात आला. तिला शिक्षिका छाया शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी राजाराम भोंग, विस्ताराधिकारी अनिल बदे, केंद्रप्रमुख महादेव यादव, मुख्याध्यापक लहू गभाले यांच्यासह ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.