करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समीतीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव

करमाळा प्रतिनिधी – सुनिल भोसले

राज्यातील बाजार समित्याना नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2000 कोटी रूपयाची तरतूद केली आहे . याबद्दल करमाळा बाजारसमिती च्या मासिक मिटींग मधे अभिनंदनाचा ठरावा बरोबरच अंशदानात सूट देण्याचा ठराव ही करण्यात आला .

काल दि 25 रोजी करमाळा बाजार समिती ची मासिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सभापती प्रा शिवाजीराव बंडगर होते .
विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर झाल्यानंतर सभापती बंडगर यानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.

बंडगर म्हणाले की ,बाजार समित्यांच्या आजवर च्या इतिहासात यापूर्वी च्या कोणत्याही सरकारने बाजार समित्याना अर्थसंकल्पात तरतूद करून मदत केलेली नाही. परंतु अजित दादा पवार यानी कालच्या अर्थसंकल्पात 2000 कोटींची भरीव तरतूद घोषीत केली आहे . त्यामुळे त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडत आहे .

या ठरावास बागल गटाचे नेते दिग्वीजय बागल यानी अनुमोदन दिले . ते म्हणाले डबघाईला आले ल्या बाजार समित्याना उर्जितअवस्था प्राप्त होण्या साठी अजित दादांचा निर्णय उपयुक्त ठरेल.

या शिवाय सरकार बाजार समित्या कडून एकूण टर्न ओव्हर च्या (एकूण व्यवहाराच्या) पाच टक्के रक्कम अंशदान रूपाने घेत असते. परंतु सध्या कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमी वर तसेच अतिवृष्टी मुळे बाजार समित्या अडचणी आहेत त्यामुळे चालू आर्थिक वर्षासाठी शासनाने अंशदाना त सूट ध्यावी असा ठराव बागल गटाचे नेते दिग्वीजय बागल यानी मांडला तर त्यास चिंतामणी जगताप यानी अनुमोदन दिले.

या बैठकीस आनंदकुमार ढेरे, संतोष वारे , सरस्वती केकान, अमोल झाकणे, रंगनाथ शिंदे, वालचंद रोडगे, चंद्रकांत सरडे, शैलाताई लबडे, दादा मोरे,विजय,गुगळे, मयुर दोशी ,सदा पाटील आदी संचालक उपस्थित होते.

विषय वाचन व सूत्रसंचालन सचिव सुनील शिंदे यानी केले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE