करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

मुळ करमाळा तालुक्यातील बापाचे संतापजनक कृत्य ; मुलींचा खुन करुन स्वतः केली आत्महत्या

करमाळा समाचार – वृतसंस्था 

इंदोरी (ता. मावळ) गावात एका बापानेच मुलींच्या प्रेमप्रकरण आणि चारित्र्यावर संशय घेऊन मध्यरात्री मुलींना रस्त्यावर झोपविले आणि त्यांच्या अंगावरून ट्रक घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर पित्याने स्वत: दुसऱ्या ट्रकखाली उडी घेत आत्महत्या केली. रविवारी (ता. 18) मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली.

नंदीनी भराटे (वय 19), वैष्णवी भराटे (वय 14) असे खून झालेल्या दोन्ही बहिणींची नावे आहेत. तर त्यांचे वडील भरत भराटे (वय 45, तिघेही रा.इंदोरी, ता. मावळ, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या पित्याचे नाव आहे. या प्रकरणी सपना भरत भराटे (वय 36, रा. सावडी, ता. करमाळा, जि. सोलापूर, सध्या रा. इंदोरी, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भराटे कुटुंब हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्‍यातील आहे. गेल्या काही वर्षांपासून हे कुटुंब मावळ तालुक्‍यातील इंदोरी गावातील अल्फा नगरी सोसायटीत वास्तव्यास होते. भरत भराटे यांचा स्वत:चा ट्रक होता. त्यांना पत्नी आणि दोन मुली होत्या. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुलींचे प्रेमप्रकरण सुरू आहेत, असा संशय भरत भराटे यांना होता. मुलींच्या ‘अशा’ वागण्याने नाव खराब होईल, यापेक्षा जीव दिलेला बरा, असे भरत भराटे हे पत्नी सपना यांना वारंवार बोलून दाखवत होते.

ads

दरम्यान, मुलींच्या प्रेमप्रकरणाच्या संशयातून भरत भराटे यांनी रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास दोन्ही मुलींना रस्त्यावर झोपायला सांगितले. आणि मुलींच्या अंगावर ट्रक (एम.एच.12/एच.डी./1604) चालविला. नंदीनी आणि वैष्णवी या दोन्ही मुलींच्या अंगावरून ट्रक घालून त्यांचा खून केला. त्यानंतर भरत भराटे यांनीही धावत्या ट्रकखाली आत्महत्या केली, असे फिर्यादी सपना भराटे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिस पुढील तपास करीत आहेत.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE