करमाळासोलापूर जिल्हा

कोरोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांचे मोफत अंत्यविधी ; पैसे घेणाऱ्यांची तक्रार करा

करमाळा समाचार

करमाळा नगरपरिषदेकडून शासकिय रूग्णालयात मरण पावलेल्या कोरोना रूग्णांवर अंत्यविधी करण्यात येते. यासंदर्भात कोणतेही शुल्क आकरण्यात येत नाही. त्याबाबत नातेवाईकांकडूनही स्वाक्षरी घेण्यासाठी आजपासून डायरी ठेवत आहोत.

मात्र काही तक्रारदार कोणताही पुरावा सादर न करता अँम्बुलन्सवाले अंत्यविधीसाठी 10000 -15000 शुल्क आकारतात अशी तक्रार फोन करून करत आहेत. याची मी शहानिशा केली असता त्यात तत्थ दिसून आले नाही असे स्पष्टीकरण शंभुराजे जगताप यांनी दिले आहे.

माञ खोट्या तक्रारीमुळे अंत्यविधी करणाऱ्या मेहतर कर्मचारी दुखावले गेले आहेत. त्यातील काही कर्मचारी कोरोना बाधीतही झाले आहेत व काही कोरोनातून बाहेर पडून अशक्तपणा असतांनाही काम करत आहेत. अंत्यविधीचे काम मेहतर व्यतिरिक्त कोणीही करत नाही व अशांची संख्या देखील कमी आहे. तरी अशी तक्रार लेखी व पुराव्यानिशी करावी ही कळकळीची विनंती

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE