विदेशी मद्याची अवैध वाहतुक करणाऱ्या सोनारीच्या एकावर करमाळा पोलिसांकडुन कारवाई
करमाळा समाचार
मौलाली माळ करमाळा ते अवैध विदेशी दारू मोटारसायकल वरून वाहतूक करणाऱ्या गुणवंत महादेव खाडे सोनारी ता परांडा जि उस्मानाबाद यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून मोटारसायकल व विदेशी दारू असा एकूण 46 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई करमाळा पोलीस ठाणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

करमाळा पोलिस ठाणे हद्दीत दिनांक 7रोजी करमाळा शहरातून अवैध दारू मोटारसायकलवरून वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना मिळाल्यानंतर डीबी पथकाचे पोलीस हेडकॉन्स्टेबल देवकर, पोलीस कॉन्स्टेबल गवळी, काझी यांनी मौलाली माळ येथे सदरच्या मोटरसायकल स्वरास अडवले व त्या कडील मुद्देमाल जप्त केला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल हिरे, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे अंमलदार यांनी केली आहे.