करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

जीवंतपणी मतदार दाखवले मयत , एकाने फोडली मशीन तर मराठा तरुणांनी मतदानावर अभ्यास करायला मागितली वेळ

करमाळा समाचार

उमरड येथील विषयावर चर्चा करताना

करमाळा शहरातील शाळा क्रमांक दोन येथील मतदान केंद्रावर एका माथेफिरूने व्हीव्हीपॅट मशीनवर हातोडीने फोडण्याचा प्रयत्न केल्याने गोंधळ निर्माण झाला. तर संबंधिताला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर सुरळीत मतदान पार पडले शिवाय उमरड येथील १०० पेक्षा जास्त मतदारांना मयत घोषित केल्याने त्यांना मतदानापासून वंचित रहावे लागले आहे. तर हिंगणी गावात थोडा वेळ मशीन बंद पडल्याने वेळ वाढवून देण्यात आला होता. करमाळा विधानसभा मध्ये ५५.८३ टक्के मतदान झाले आहे. मागील वेळी ६२% मतदान नोंदवले गेले होते.

तालुक्यात मांजरगाव, पाथुर्डी, हिंगणी, उमरड व करमाळा शहरातील घटना वगळता सर्वत्र मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. यावेळी प्रशासनाच्या वतीने औषधे, व्हीलचेअर व मंडपाची सोय केल्याने नागरिकांना त्रास झाला नाही. पण उन्हाच्या तडाख्यामुळे मतदानावर त्याचा प्रभाव पडला असल्याचे दिसून आले. शहरात सकाळी एका भागात पाणी आल्याने त्या भागातील नागरिकांनी मतदानासाठी जाण्यास उशीर केला.

तर दुसऱ्या भागात मोठ्या प्रमाणावर मतदान झाल्याचे दिसून आले. दुपारच्या वेळी मतदान संत गतीने सुरू होते. तर सायंकाळी पुन्हा एकदा मतदानाचा जोर वाढल्याचे दिसून आले. तर ग्रामीण भागातील पाथुर्डी व हिंगणी परिसरात मशीन काही काळ बंद पडल्याने मतदान थांबले. नंतर मशीन सुरू करून पुन्हा एकदा सुरळीत करण्यात आले.

मांजरगाव येथील तरुण

मराठा आरक्षण व कुणबी दाखल्यावरुन तरुणांची नाराजी…
मांजरगाव येथे सकल मराठा समाजाची कार्यकर्ते सचिन चव्हाण, प्रकाश चव्हाण, राहुल चव्हाण यांनी अनुक्रमे केल्या एक मराठा लाख मराठा म्हणून सह्या मतदान केंद्रावर बॅलेट सोडल्यानंतर कार्यकर्त्यांनी वेळ मागितला. आरक्षणाच्या अभ्यासासाठी वेळ घेता मग आम्हाला मतदान करायला पण वेळ द्या असे त्या युवकांचे म्हणणे होते. शिवाय शासकीय कामातही सरकारी बाबु वेळ लावतात मग आम्ही लोकशाहीने मतदान करताना अभ्यास करुन मतदान करु असे यावेळी हे युवक म्हणत असल्याने थोडावेळ गोंधळ झाला. नंतर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.

उमरड येथे १०० पेक्षा जास्त मतदार वंचीत …
तालुक्यातील उमरड येथे मतदान करण्यासाठी आल्यानंतर सदरच्या मतपत्रिकेमधील मतदारांच्या नावापुढे डिलीट तसेच मयत असा उल्लेख असल्यामुळे जिवंतपणीच संबंधित लोकांना मयत घोषित करण्यात आले होते. त्यामुळे त्या लोकांना मतदान करता आले नाही. या संपूर्ण प्रकाराबाबत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून चौकशीची मागणी केली असल्याची माहिती गावातील सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ कदम यांनी दिली. यामुळे काही काळ मतदान प्रक्रिया ही थांबवण्यात आली होती. तर नंतर संबंधितांची समजूत काढून इतर मतदान सुरळीत पार पाडले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE