करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यात पुर्व सोगावात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मिळालाय ; ओळखीचा असेल तर पोलिसांना कळवा

करमाळा समाचार 

करमाळा तालुक्यातील सोगाव पूर्व गावचे हद्दीतून जाणाऱ्या रेल्वे लाईन दगड क्रमांक 329/3 व 329/4 चे मध्ये रेल्वेतून पडून डोक्यात व दोन्ही हातासह पायास जबर जखमा होऊन जागीच मयत झाला आहे. सदर व्यक्तीची ओळख पटलेली नाही.

मंगळवार दिनांक 20 रोजी अंदाजे 35 वर्ष वयाच्या पुरुष जातीचे बेवारस मृत शरीर सोगाव पूर्व परिसरात मिळून आले आहे. संबंधित व्यक्तीची ओळख पटली नाही. मयताची उंची पाच फूट सात इंच आहे. त्याच्या डोक्यास काळे केस, अंगात गुलाबी रंगाचा फुलभाई गोल गळा टी-शर्ट व राखाडी रंगाची पॅन्ट निळ्या रंगाच्या दोरीने बांधलेली आहे. त्याच्या डाव्या पायात अंगठा नाही. अशा वर्णनाची व्यक्ती कोणी आपल्या ओळखीचे असल्यास करमाळा पोलीस ठाणे 021 82 220 333 या किंवा 98 90055 185 या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा अशी माहिती करमाळा पोलीस ठाण्याच्या वतीने देण्यात आली आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE