करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक कॅथलॅब सेवेचा दिमाखात शुभारंभ

करमाळा

तालुक्यातील आरोग्य क्षेत्रात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून गेली अनेक वर्षे कार्यरत असलेल्या करमाळा येथील प्रसिद्ध जाधव-पाटील हॉस्पिटल, आय.सी.यू. अँड कॅथलॅब (सी.सी.यू.) आणि जिजाऊ पॅथॉलॉजी लॅब मध्ये अत्याधुनिक कॅथलॅब सुविधेचा भव्य उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.

सोमवार, दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता झालेल्या या सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. अविनाश घोलप उपस्थित होते.

करमाळ्यातच होणार अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी

यापूर्वी हृदयविकाराच्या झटक्यासाठी किंवा अँजिओग्राफी-अँजिओप्लास्टीसाठी करमाळ्यातील रुग्णांना सोलापूर, पुणे येथे धाव घ्यावी लागत होती. त्यात बराच वेळ वाया जात होता. आता जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये कॅथलॅब सुरु झाल्याने हृदयरोगावरील तातडीचे आणि अत्याधुनिक उपचार करमाळ्यातच उपलब्ध होणार आहेत. कै. डॉ. प्रदीपकुमार (आबा) जाधव-पाटील यांच्या विचारांचा वारसा जपत हॉस्पिटलने हे मोठे पाऊल उचलले आहे.

मान्यवरांची मांदियाळी

या सोहळ्याला तालुक्यातील राजकीय, सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती. प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे, रश्मी (दिदी) बागल-कोलते, विलासराव घुमरे सर,नगराध्यक्षा मोहिनी ताई सावंत, सभापती पूजा ताई ढेरे, उपसभापती अजित विघ्ने,दिग्विजय भैय्या बागल, मंगेश चिवटे ,विक्रमसिंह शिंदे, यशवंत भैय्या शिंदे ,शंभूराजे जगताप, सविताराजे भोसले, योगेश दळवे सर,भरत भाऊ आवताडे,सुजित तात्या बागल अतुल पाटील, प्रकाश पाटील ,धुळाभाऊ कोकरे, राजेंद्रसिंह राजेभोसले,अशपाक जमादार, जयप्रकाश बिले सर, जगदीश आग्रवाल, विवेक येवले, उदयसिंह देशमुख, आशिष गायकवाड,राजाबापू पाटील, नितीन, जगदाळे दादासाहेब जाधव,रवींद्र वळेकर, नितीन खटके ,डॉ केवारे,डॉ संतोष आटोळे, डॉ नागनाथ लोकरे, डॉ रोहन हेगडे, डॉ स्वप्नील माळी यांच्यासह पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, करमाळा तालुका प्रॅक्टिशनर असोसिएशन आणि करमाळा मेडिकोज गिल्डचे सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रोहन पाटील यांनी केले, तर आभार डॉ. शिवानी पाटील यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोषकुमार पाटील, अभिजित पाटील, अजिंक्य पाटील व संपूर्ण जाधव-पाटील परिवाराने विशेष परिश्रम घेतले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी करमाळा शहर व तालुक्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE