करमाळासोलापूर जिल्हा

करमाळ्यात युवकाला सत्तुरने मारहाण ; तिघांवर गुन्हा दाखल

करमाळा समाचार 

रागात बघतो म्हणुन अशा शुल्लक कारणावरून करमाळा शहरात एका युवकास सत्तुर ने मारून जखमी करून लोखंडी गजाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तीघांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे 1) अरबाज अकबर शेख (घोडके) 2) महमंद खासीम शेख 3) अरिज पटेल असे तिघांचे नाव आहे. तर जहीर जाकीर शेख हा जखमी झाला आहे.

दुपारी दोन च्या सुमारास जहीर भाजी मंडईजवळील पेट्रोलपंपाजवळ गेला. त्यावेळी तेथे अरबाज अकबर शेख (घोडके) याच्या हातात मटन तोडण्याचे सत्तुर होते. महमंद खासीम शेख याच्या हातात बोकड कापण्याचे चाकु होता. तसेच अरिज पटेल याच्या हातात लोखंडी गज होता त्या तीघांनी जहीरला रात्री अरबाज शेख यांचेकडे रागाने का बघतो असे म्हणुन मला शिवीगाळ करु लागले.

अरबाज अकबर शेख (घोडके) याने त्याच्या हातातील सत्तुरने डोकीत मारुन गंभीर जखमी केले. तसेच महमद शेख ,अरिज पटेल यांनी हाताने लाथाबुक्कयाने मारहाण करुन अरिज पटेल याने त्याच्या हातातील लोखंडी गजाने पाटीवर, डावे हाताचे कोपऱ्यावर मारुन जखमी केले. तसेच महमंद शेख याने चाकुच्या मुठीने मुक्कामार दिला आहे अशी फिर्याद जहीर ने दिली आहे.

ads

त्यानंतर त्याला धमकी देऊन तिघे निघुन गेले. जहीरला दवाखान्यात नेल्यानंतर पुढील उपचारासाठी पाठवले आहे. घटनेचा पुढील तपास हवालदार देवकर करीत आहेत.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE