परिक्षार्थीची सोय म्हणुन करमाळ्यातुन जादा गाड्यांची सोय
करमाळा समाचार
दिनांक 4/09/2021 रोजी राज्यसेवा महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित – गट ब चा पेपर आहे. अनेक परिक्षार्थीचे परीक्षेसाठी चे केंद्र सोलापूर आहे.

परिक्षार्थींची परिक्षेला जाणे येणे ची सोय म्हणून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, करमाळा आगाराने सोलापूर साठी ज्यादा बसेस ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या बसेस अनुक्रमे 5.30, 6.00 व 6.30 ला करमाळा येथून निघतील. परतीच्या प्रवासासाठी 12.30, 13.00 व 13.00 वाजता या बसेस उपलब्ध असतील.

तसेच पुणे, नगर या मार्गावर देखील विद्यार्थी प्रतिसाद पाहता बस सोडण्यात येतील. या सर्व बसेस चे सॅनिटायझेशन करण्यात येईल त्यामुळे कोरोनाच्या काळात बसचा प्रवास सुरक्षित असेल. अधिक माहिती साठी 02182- 20336, श्री. – पाटणे – वाहतूक नियंत्रक, करमाळा आगार -9822923374)या क्रमांकावर संपर्क साधावा. – प्रशासन करमाळा आगार.