तालुक्यातील जिंती येथे एकाचा खुन ; पोलिस आरोपीच्या शोधात
करमाळा समाचार
जिंती तालुका करमाळा येथे रात्री झालेल्या मारहाणीत एका वृद्धाचा सकाळी दवाखान्यात नेत असताना मृत्यू झाला आहे. सदरची घटना शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली. त्यानंतर त्यांना करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे घेऊन जात असताना राजाराम मारुती जगताप हे मयत झाले आहेत. दवाखान्यात पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनास्थळी करमाळा पोलीस पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे. तर राजाराम मारुती जगताप वय 75 यांचा मृत्यू झाल्यानंतर उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदन केले जात आहे. त्यानंतर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाईल.

नेमकं कारण अद्याप समोर आले नसून त्यांना मारहाण कशामुळे झाली हे कळाले नाही. तरी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत असे माहिती पोलिसांनी दिली आहे.