करमाळासोलापूर जिल्हा

केत्तुर खुन प्रकरणातील तपास अंतीम टप्प्यात – कोकणे ; खुन होऊन उलटले आकरा दिवस

प्रतिनिधी – करमाळा

शुक्रवारी (दि १ ) दुपारी केत्तुर ता. करमाळा येथील जनावरांच्या मागे गेलेला शेतकरी पुन्हा माघारीच आला नाही. त्यामुळे करमाळा पोलिसात तक्रार दिल्यानंतर संबंधिताचा शोध घेण्यात आला. तर ती व्यक्ती गावातीलच स्मशानभूमी शेजारी मृत पडलेली मिळून आली होती. सदरच्या व्यक्तीच्या डोक्यात कोणीतरी जोरदार घाव केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते. नेमके हे प्रकरण कशातून घडले हे मात्र उघडकीस आले नव्हते. तरी पोलीस विविधअंगाने याची चौकशी करीत आहेत. सदरचा प्रकार शनिवारी पहाटे सातच्या सुमारास उघडकीस होता.

शिवाजी सिताराम येडे (वय ४८) रा. केत्तुर ता. करमाळा हे शुक्रवारी दुपारी म्हशी घेऊन शेताकडे गेले होते. सायंकाळी सातच्या सुमारास ते म्हशी घेऊन माघारी फिरत असत. पण काल शुक्रवारी शिवाजी येडे हे माघारी आलेच नाहीत. परंतु म्हशी मात्र घरी पोहोच झाल्या होत्या. थोड्या उशिरा येतील म्हणून घरच्यांनाही लगेचच शोधाशोध केली नाही. पण रात्र झाली तरीही येडे घरी आलेच नाहीत म्हणून कुटुंबीयांनी शोधाशोध केली. तर याबाबत पोलिसात ही तक्रार दाखल केली.

त्यावेळी करमाळा पोलिसांनी पहाटे तपासाला सुरुवात केली. तसेच गावकऱ्यांनी ही परिसरात शोधा शोध सुरू केली होती. यावेळी केतुर ते पोमलवाडी जाणाऱ्या रस्त्याला उजनी धरणाच्या पुलाजवळ स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमी शेजारी ते मृतशरीर मिळून आले. परंतु त्या डोक्याला मोठी जखम असतानाही परिसरात कुठेही रक्त सांडलेले दिसून येत नव्हते. त्यामुळे पोलिसांना वेगळाच संशय येऊ लागला. सदरच्या ठिकाणी रक्त नसल्यामुळे त्या व्यक्तीला दुसरीकडे मारून त्या ठिकाणी आणून टाकल्या बाबत संशय उत्पन्न झाला होता.

या प्रकरणात तपास करीत असताना आतापर्यंत अनेकांची तपासणी करण्यात आली आहे. कॉल डिटेल तसेच संबंधित दूध विक्रेता चे कोणासोबत काही भांडण वगैरे झाले होते का ? यासंदर्भात ही चौकशी सुरू आहे. तपासात विविध विषय समोर येत असून तपास थोडासा किचकट बनलेला असतानाही पोलीस सध्या आरोपीच्या जवळ पोहचले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी दिली आहे. लवकरच आरोपी कोण आहे आहे सर्वांसमोर येणार असल्याचे माहीती यावेळी कोकणे यांनी दिली आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE